FDA IAS Tukaram Mundhe: राज्यात भेसळयुक्त अन्न -पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांनी जेरबंद घातला आहे. यात अनेक नामवंत हॉटेल्स, रेस्टॉरंट्स तसेच देशी-विदेशी पॅकेज फूड कंपन्यांचा खरा चेहरा सर्वसामान्यांसमोर आला आहे. ग्राहक कोणतेही पॅकेजयुक्त फूड विकत घेताना प्राथमिक माहिती म्हणजे त्यावरील एक्सपायरी डेट (कालबाह्य तारीख) तपासतात आणि योग्य त्या पदार्थांची खरेदी करतात.
परंतु या तपासणीवरसुद्धा आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यासंबंधित IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांनी काल एक्स वर एक पोस्ट शेअर केली.
When a label lies, the consumer pays the price. An expiry date is not just ink on a package.A nutrition label is not just information.They are promises made to the consumer. When those promises are deliberately manipulated, it is not merely a violation of regulations, it is a… — Tukaram Mundhe (@Tukaram_IndIAS) September 2, 2026
अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे म्हणतात,
“जेव्हा उत्पादनावरील माहिती चुकीची असते, तेव्हा ग्राहकाला त्याची किंमत मोजावी लागते. ‘एक्सपायरी डेट’ (कालबाह्यता तारीख) म्हणजे केवळ पॅकेजवरची शाई नसते आणि पोषणमूल्यांची माहिती (न्यूट्रिशन लेबल) म्हणजे केवळ माहिती नसते; ती ग्राहकाला दिलेली एक प्रकारची हमी असते. जेव्हा या हमींशी जाणीवपूर्वक छेडछाड केली जाते, तेव्हा ते केवळ नियमांचे उल्लंघन ठरत नाही, तर तो जनविश्वासाचाही भंग असतो. समर्थ नियमनाचा उद्देश उद्योगांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणे हा नसतो; तर अशी एक व्यवस्था निर्माण करणे हा असतो जिथे प्रामाणिक व्यवसायांचे संरक्षण होईल, नियमांचे उल्लंघन उघडकीस येईल आणि नागरिकांची फसवणूक होणार नाही.”
यापूर्वी FDA ने मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयातील कॅन्टीनवर कारवाई करूनसुद्धा तेथील अस्वच्छते संबंधित पुन्हा प्रश्न समोर आला आहे. रेडी टू इट , रेडी टू कूक या पदार्थांची ही भेसळ समोर आली असून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासन काय दखल घेणार आहेत यावर सर्वांचे लक्ष आहे.