Ahilyanagar Trainee Doctor Death : महाविद्यालयातील अपुऱ्या सुविधा, आपत्कालीन अव्यवस्थेच्या विरोधात विद्यार्थी आक्रमक; डॉक्टरच्या मृत्यूनंतर प्रशासनावर गंभीर आरोप

गिरीश रासकर, प्रतिनिधी  अहिल्यानगर : अहिल्यानगर येथील अहमदनगर होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी डॉ. गायत्री औताडेच्या दुर्दैवी मृत्यूनंतर विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केला आहे. तिसऱ्या मजल्यावर असताना अचानक भोवळ येऊन जमिनीवर कोसळलेल्या डॉ. गायत्री या प्रशिक्षणार्थी डॉक्टरचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर प्रशासनाने दुर्दैवी घटनेचा शोक व्यक्त न केल्याने आणि अपुऱ्या आपत्कालीन सुविधांमुळे संतापलेल्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या गेटसमोर तब्बल 2 तास […]

Ahilyanagar Trainee Doctor Death : महाविद्यालयातील अपुऱ्या सुविधा, आपत्कालीन अव्यवस्थेच्या विरोधात विद्यार्थी आक्रमक; डॉक्टरच्या मृत्यूनंतर प्रशासनावर गंभीर आरोप

गिरीश रासकर, प्रतिनिधी 

अहिल्यानगर : अहिल्यानगर येथील अहमदनगर होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी डॉ. गायत्री औताडेच्या दुर्दैवी मृत्यूनंतर विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केला आहे. तिसऱ्या मजल्यावर असताना अचानक भोवळ येऊन जमिनीवर कोसळलेल्या डॉ. गायत्री या प्रशिक्षणार्थी डॉक्टरचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर प्रशासनाने दुर्दैवी घटनेचा शोक व्यक्त न केल्याने आणि अपुऱ्या आपत्कालीन सुविधांमुळे संतापलेल्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या गेटसमोर तब्बल 2 तास ठिय्या आंदोलन केले. बंद सीसीटीव्ही, खासगी रुग्णालयात भरती करताना वैद्यकीय अर्जावर सही न करून महाविद्यालय प्रशासनाने जबाबदारी ढकलल्याचा गंभीर आरोप विद्यार्थ्यांनी केला. पोलिसांच्या मध्यस्थीने लेखी आश्वासन मिळाल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले. 

दरम्यान, विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. रुग्णालयाचे ‘NABH’ मानांकन कागदावरच असून, रुग्णवाहिकेत ऑक्सिजन, सीपीआर किंवा प्राथमिक जीववरक्षक सुविधा नव्हती, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. बंद कॅमेऱ्यांमुळे घटनेतील नेमके कारण अस्पष्ट आहे. हृदयविकाराची पार्श्वभूमी असली तरी वेळेवर प्रथमोपचार मिळाले असते तर प्राण वाचले असते, असे सांगत विद्यार्थ्यांनी घटनेच्या जबाबदारांच्या राजीनाम्याची आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची मागणी आंदोलनादरम्यान महाविद्यालय प्रशासनाकडे केली आहे.

वैद्यकीय विद्यार्थिनी डॉ. गायत्री औताडे यांच्या मृत्यूप्रकरणी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर महाविद्यालय प्रशासनाने आपली भूमिका मांडली आहे. महाविद्यालय प्रशासनाने आंदोलन विद्यार्थ्यांनी केलेले आरोप फेटाळत तिच्या वैद्यकीय इतिहासाची पूर्वकल्पना नसल्याचा दावा केला. मात्र, खासगी रुग्णालयातील उपचाराची वैद्यकीय जबाबदारी आणि कागदपत्रांवर स्वाक्षरी करणे टाळल्याचे मान्य करत प्रशासनाने आपली चूक झाकण्याचा आणि सारवासारव करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. यामुळे अधिक आक्रमक झालेल्या विद्यार्थ्यांनी प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित केले. परंतु सुविधा न सुधारल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला. आता या संपूर्ण प्रकरणात पोलीस प्रशासन आणि वैद्यकीय परिषद कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत प्राचार्य डॉ. सुनील पवार यांनी माहिती दिली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number