जय महाराष्ट्र न्यूज, पुणे
धक्का लागल्याच्या शुल्लक कारणावरुन 2 महिलांमध्ये बाचाबाची झाली आणि याचं रुपांतर मारहाणीत झाल्याची घटना पुणे- सोलापूर पॅसेंजरमध्ये पारेवाडी स्थानकाजवळ
घडली.
लाकडी दांडक्याने 15-20 जणांच्या टोळक्याने दोघांना अमानुषपणे मारहाण केली. या मारहाणीमध्ये भिमराव भोसले आणि प्रेमा भोसले गंभीर जखमी झाले आहेत.
याप्रकरणी दौंड पोलिसांनी आत्तापर्यंत 10 जणांना अटक केली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.