Nashik Trimbakeshwar Traffic Update : त्र्यंबकेश्वरला जाणाऱ्या भाविकांसाठी महत्त्वाची बातमी! सर्व खासगी वाहनांना प्रवेशबंदी; पर्यायी मार्ग कोणते?

श्रावण महिना आणि लागून आलेल्या सुट्ट्यांमुळे त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांचा मोठा ओघ निर्माण झाल्यामुळे वाढत्या गर्दीमुळे नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

Nashik Trimbakeshwar Traffic Update : त्र्यंबकेश्वरला जाणाऱ्या भाविकांसाठी महत्त्वाची बातमी! सर्व खासगी वाहनांना प्रवेशबंदी; पर्यायी मार्ग कोणते?

श्रावण महिना आणि विकेंडमुळे नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची अलोट गर्दी झाली आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. यावेळी भाविकांची संख्या वाढल्याने दर्शनाची रांग लांबपर्यंत वाढत चाललेल्या आहेत. श्रावण महिना आणि लागून आलेल्या सुट्ट्यांमुळे त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांचा मोठा ओघ निर्माण झाल्यामुळे वाढत्या गर्दीमुळे नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. भाविकांच्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी प्रशासनाची कसरत झालेली पाहायला मिळाली. 

अशातच श्रावण सोमवारनिमित्त त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या वाहतुकीचे नियमन करण्याचा मोठा निर्णय वाहतूक प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. यावेळी त्र्यंबकेश्वर शहरात सर्व खासगी वाहनांना प्रवेशबंदी असणार आहे. खासगी वाहने खंबाळे येथील बाह्य वाहनतळावर थांबविण्यात येणार असून कार, टॅक्सी, रिक्षा व इतर खासगी वाहनांनी खंबाळे वाहनतळाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर खंबाळे येथून भाविकांसाठी एस.टी. महामंडळाच्या अतिरिक्त बसेसची सुविधा करण्यात आली आहे. 

हेही वाचा- Weather Update : वीकेंडला पावसाची जोरदार एंट्री! रविवारी घराबाहेर पडणार असाल तर सावधान; कोणत्या भागात हवामान खात्याचा अलर्ट?

एस.टी. बसेस, रुग्णवाहिका, अग्निशमन, पोलीस व अत्यावश्यक वाहने नियमनातून वगळली आहेत. स्थानिक रहिवाशांच्या ओळखपत्र असलेल्या वाहनांना प्रवेश असणार आहे. दरम्यान ज्येष्ठ नागरिक, हृदयरोगी, गर्भवती महिला, स्तनदा माता आणि लहान मुलांनी गर्दीच्या काळात त्र्यंबकेश्वरला येणे टाळण्याचे प्रशासनाचे आवाहन आहे. पहिल्या, दुसऱ्या व चौथ्या सोमवारी 1 ते 1.50 लाख भाविकांसह तिसऱ्या सोमवारी तब्बल 4 ते 4.50 लाख भाविक येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यानुसार नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गावर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 

त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या वाहतुकीचे नियमन
नाशिक वरून जाणाऱ्या जव्हार-मोखाडा-पालघरकडील वाहतूक पर्यायी मार्गाने
नाशिक → गोवर्धन → गिरणारे → धोंडेगाव → देवरगाव → वाघेरा फाटा → आंबोली फाटा → जव्हार या मार्गाने वाहतूक वळविणार
वाहतूक नियमनाचा कालावधी पहिला सोमवार : 16 ऑगस्ट सकाळी 6 ते 17 ऑगस्ट रात्री 8
दुसरा सोमवार : 22 ऑगस्ट सकाळी 6 ते 24 ऑगस्ट रात्री 8
तिसरा सोमवार : 29 ऑगस्ट सकाळी 6 ते 31 ऑगस्ट रात्री 8
चौथा सोमवार : 5 सप्टेंबर सकाळी 6 ते 7 सप्टेंबर रात्री 8
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number