आता ट्रॅफिक पोलिसांशी रस्त्यात हुज्जत घालताना दहा वेळा विचार करा नाही तर…

आता ट्रॅफिक पोलिसांशी रस्त्यात हुज्जत घालताना दहा वेळा विचार करा नाही तर…

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

वाहतूक पोलिसांशी बाचाबाची करताना किंवा हुज्जत घालताना यापुढे दहा वेळा विचार करा.  कारण, की लवकरच मुंबईतील सर्व वाहतूक पोलिसांच्या छातीवर वायफाय

कॅमेरा लावण्यात येणार आहेत. 

 

यंत्रणेत पारदर्शकता यावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला. नेहमीच्या वॉकी-टॉकी आणि लवाजमाशिवाय पोलिसांना आता हा वायफाय कॅमेराही सोबत बाळगावा

लागणार आहे. 

 

या कॅमेऱ्यात रस्त्यावरील पोलिसाचं प्रत्येक वाहनचालकांसोबतचं संभाषण रेकॉर्ड केलं जाईल आणि त्याचा पुरावा म्हणून उपयोग होणार.

 

त्यामुळे एखादा व्यक्ती पोलिसांशी जे काही संभाषण किंवा अरेरावी करेल ती सगळी रेकॉर्ड होऊन कंट्रोल रुमला जाईल. कायदेशीर कारवाईसाठी पुरावा म्हणून रेकॉर्ड

केलेली माहिती ग्राह्य धरली जाणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version