Gold-Silver Rate : सणासुदीच्या काळात चांदीच्या दरांनी गाठला नवा उच्चांक! चांदीच्या दरात 10 हजारांची उसळी, तर सोन्याचे दर 6 हजारांनी…

सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून सोन्याकडे पाहण्याचा कल वाढल्याने जळगावच्या बाजारात सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे.

Gold-Silver Rate : सणासुदीच्या काळात चांदीच्या दरांनी गाठला नवा उच्चांक! चांदीच्या दरात 10 हजारांची उसळी, तर सोन्याचे दर 6 हजारांनी…

जगभरात वाढलेली आर्थिक आणि भू-राजकीय अस्थिरता याचा थेट परिणाम मौल्यवान धातूंच्या बाजारावर होताना दिसत आहे. सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून सोन्याकडे पाहण्याचा कल वाढल्याने जळगावच्या बाजारात सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. जळगावच्या बाजारात सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 65 हजार रुपयांवर जाऊन पोहोचले आहेत.

तर चांदीचे दर 2 लाख 60 हजार रुपयांवर पोहचले आहेत. जगात वाढलेली आर्थिक आणि भू राजकीय अस्थिरता असताना युद्धजन्य परिस्थितीत फेडरल रिझर्व बँक व्याजदर निश्चित करणार होते. जळगावच्या बाजारात सोने-चांदीच्या दरात पुन्हा मोठी भाव वाढ झाली असून दोन दिवसात सोन्याचे भाव हे सहा हजार रुपयांनी तर चांदीचे भाव जवळपास दहा हजार रुपयांनी वाढले आहेत.

हेही वाचा- Tukaram Mundhe FDA Action : मुंबईत तुकाराम मुंढेंची करडी नजर! मॅकडोनाल्डसह 13 प्रसिद्ध रेस्टॉरंट्सवर FDAची धडक कारवाई

भाववाढी मागची प्रमुख कारणे?
या भाववाढी मागची प्रमुख कारणे अशी आहेत की, जगात वाढलेली आर्थिक आणि भू राजकीय अस्थिरता, युद्धजन्य परिस्थिती भारताच्या तुलनेत बघता डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण, मध्यवर्ती बँक सोने खरेदी करत आहे. फेडरल रिझर्व बँक व्याजदर निश्चित करणार होते मात्र विलंब होत आहे. अमेरिका महागाई बाबत धोरण निश्चित करणार होती, मात्र ते धोरण निश्चित झाले नसून यामुळेच ही भाव वाढ झाली असल्याचे समोर आले आहे.

आगामी काळात तज्ज्ञांचा अंदाज काय? 
आगामी काळात देखील मोठी भाव वाढ होऊ शकते, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला असून जळगावच्या बाजारात सोन्याचे दर हे जीएसटी सह 1 लाख 65 हजार रुपयांवर जाऊन पोहोचले आहेत. तर चांदीचे दर 2 लाख 60हजार रुपयांवर जाऊन पोहोचले आहे. दरम्यान, सणासुदीचा काळ जवळ येत असताना सोन्या-चांदीच्या दरात आणखी चढ-उतार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात दर कमी होणार की तेजी कायम राहणार, याकडे ग्राहक आणि सराफा व्यावसायिकांचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number