Central Railway Block: मध्य रेल्वे मार्गावर 3 ते 9 सप्टेंबर विशेष ब्लॉक! अनेक लोकल रद्द; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

टिटवाळा स्थानकातील प्लॅटफॉर्म विस्तारणीसाठी ३ ते ९ सप्टेंबरदरम्यान मध्य रेल्वेने रात्री विशेष ब्लॉक जाहीर केला आहे.

Central Railway Block: मध्य रेल्वे मार्गावर 3 ते 9 सप्टेंबर विशेष ब्लॉक! अनेक लोकल रद्द; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

मध्य रेल्वेने टिटवाळा स्थानकातील प्लॅटफॉर्म विस्तारणीच्या कामासाठी ३ ते ९ सप्टेंबरदरम्यान विशेष रेल्वे ब्लॉक जाहीर केला आहे. भविष्यात १५ डब्यांच्या लोकल सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने हे काम करण्यात येत असून, या कालावधीत रात्रीच्या लोकल सेवांवर मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळे कसारा, टिटवाळा, कल्याण आणि ठाणे मार्गावरील प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन आधीच करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, ३ सप्टेंबरपासून ९ सप्टेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत दररोज रात्री १२ ते पहाटे ५ वाजेपर्यंत अप आणि डाउन मार्गावर ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक राहणार आहे. या काळात रेल्वे रुळांवर आणि प्लॅटफॉर्म परिसरात तांत्रिक कामे करण्यात येणार आहेत.

कोणत्या लोकल रद्द राहणार?

या ब्लॉकचा सर्वाधिक फटका टिटवाळा-कसारा मार्गावरील रात्रीच्या लोकल सेवांना बसणार आहे. CSMT वरून रात्री १० वाजता आणि १०.५० वाजता सुटणाऱ्या टिटवाळा लोकल पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच रात्री १०.४७ आणि मध्यरात्री १२.०८ वाजताच्या कसारा लोकलही धावणार नाहीत. याशिवाय, CSMT वरून सकाळी ६.०२ वाजताची ठाणे लोकल, ठाण्याहून पहाटे ५.३५ वाजताची टिटवाळा लोकल आणि कुर्ला-कल्याण सायंकाळी ५.५९ वाजताची लोकल देखील रद्द राहणार आहे.

अप दिशेच्या सेवांवरही परिणाम

टिटवाळाहून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांनाही या ब्लॉकचा फटका बसणार आहे. सकाळी ६.१३ वाजताची तसेच रात्री ९ आणि १०.०५ वाजताच्या टिटवाळा-CSMT लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सकाळच्या आणि रात्रीच्या प्रवाशांना पर्यायी गाड्यांचा आधार घ्यावा लागणार आहे.

शेवटची लोकल किती वाजता?

ब्लॉकच्या काळात CSMT वरून कसारासाठी रात्री १०.४७ वाजता शेवटची लोकल, तर टिटवाळासाठी रात्री ११.४२ वाजता शेवटची लोकल सुटणार आहे. काही लोकल सेवा ठाणे किंवा कल्याणपर्यंतच चालवण्यात येणार असल्याने प्रवाशांनी स्टेशनवर जाण्यापूर्वी वेळापत्रक तपासण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

प्रवाशांसाठी रेल्वेचे आवाहन

मध्य रेल्वेने प्रवाशांना अधिकृत रेल्वे अॅप, स्टेशनवरील घोषणा आणि डिजिटल डिस्प्लेच्या माध्यमातून अद्ययावत माहिती तपासूनच प्रवास करण्याचे आवाहन केले आहे. १५ डब्यांच्या लोकलसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याच्या या कामामुळे काही दिवस गैरसोय होणार असली, तरी भविष्यात प्रवाशांना अधिक क्षमतेची आणि सोयीस्कर सेवा उपलब्ध होणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number