आणखी एका वाघिणीची गावकऱ्यांकडून हत्या…

‘अवनी’ टी-१ या पाच वर्षांच्या वाघिणीला ठार करुन या प्रकाराला एकच दिवस झाला असून उत्तर प्रदेशात एका वाघिणीला ठार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.या वाघिणीने एका ग्रामस्थावर हल्ला केल्याचा संशय येथील ग्रामस्थांना होता. त्यामुळे संतापाच्या भरात वाघिणीच्या अंगावर ट्रॅक्टर घालून तिला जखमी केल. इतक्यावरच न थांबता त्यांनी जखमी वाघिणीवर लाठ्यांनी हल्ला केला आणि त्यातच ती […]

आणखी एका वाघिणीची गावकऱ्यांकडून हत्या…

‘अवनी’ टी-१ या पाच वर्षांच्या वाघिणीला ठार करुन या प्रकाराला एकच दिवस झाला असून उत्तर प्रदेशात एका वाघिणीला ठार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.या वाघिणीने एका ग्रामस्थावर हल्ला केल्याचा संशय येथील ग्रामस्थांना होता.

त्यामुळे संतापाच्या भरात वाघिणीच्या अंगावर ट्रॅक्टर घालून तिला जखमी केल. इतक्यावरच न थांबता त्यांनी जखमी वाघिणीवर लाठ्यांनी हल्ला केला आणि त्यातच ती ठार झाली. या वाघिणीचा ठार करणाऱ्या गावकऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आली असल्याची माहिती वनअधिकाऱ्यांनी दिली आहे.

तर गावकऱ्यांनी या परिसरात वाघिणीचा वावर असल्याने आमच्या जीवाला धोका होता.यासंदर्भात वारंवार वनविभागाकडे तक्रार करुन हि त्यांनी कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप गावक-यांनी केला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number