Gondia Accident : गोंदियात भरधाव मालवाहू ट्रकने तीन जिवलग मित्रांना चिरडलं; ट्रकचालक फरार, तर नागरिकांमध्ये संताप

गोंदियातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गोंदिया जिल्ह्यातील गंगाझरी येथील आश्रमशाळेजवळ 16 ऑगस्ट रोजी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात तीन तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

Gondia Accident : गोंदियात भरधाव मालवाहू ट्रकने तीन जिवलग मित्रांना चिरडलं; ट्रकचालक फरार, तर नागरिकांमध्ये संताप

गोंदियातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गोंदिया जिल्ह्यातील गंगाझरी येथील आश्रमशाळेजवळ 16 ऑगस्ट रोजी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात तीन तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. भरधाव चारचाकी मालवाहु ट्रकने दुचाकीवर असलेल्या तिघांना जोरदार धडक देऊन चिरडल्याचे समोर आले आहे. दुचाकीने प्रवास करणाऱ्या तिघांना एका अनियंत्रित चारचाकी वाहनाने जबर धडक दिली ज्यात दुचाकीवरील तिन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला. 

हेही वाचा- Nashik Firing: नाशिकमध्ये पानटपरीसमोर रक्तरंजित थरार! तरुणावर जवळून दोन राऊंड फायरिंग; परिसरात खळबळ

सौरभ बघेल (वय 20), गौरव बैठवार (वय 20) आणि निखिल मेश्राम (वय 19) अशी अपघातात मृत्यू झालेल्या तिन्ही तरुणांची नावे आहेत. मृत झालेले तिघेही धापेवाडा लोधीटोला येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. धापेवाडा येथील तिघेही तरुण हे आपल्या गावाच्या दिशेने जात असताना गंगाझरी बसस्टॉप जवळ समोरून एका भरधाव मालवाहू वाहनाने त्यांना धडक दिली.

धडक दिल्यानंतर चारचाकी वाहन चालक वाहन घेऊन घटना स्थळावरून फरार झाला. ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील तिन्ही तरुणांच्या जागीच मृत्यू झाला आहे. मालवाहू वाहनाच्या चालकाला गंगाझरी पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली आहे. या घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी आणि गंगाझरी पोलिसांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तरुणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी गोंदिया येथील शासकीय रुग्णालयात पाठवले आहेत. या भीषण अपघात झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number