Mumbai Missing Cases: मुंबईत एकाच दिवशी तीन अल्पवयीन मुलं बेपत्ता; पोलिसांकडून शोधमोहीम सुरू

मुंबईत एकाच दिवशी वेगवेगळ्या भागांत तीन अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्याच्या घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे

Mumbai Missing Cases: मुंबईत एकाच दिवशी तीन अल्पवयीन मुलं बेपत्ता; पोलिसांकडून शोधमोहीम सुरू

मुंबईत एकाच दिवशी वेगवेगळ्या भागांत तीन अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्याच्या घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. गोवंडी, विक्रोळी पार्कसाईट आणि मालाड पूर्व परिसरात या घटना घडल्या असून, तिन्ही प्रकरणांत अज्ञात व्यक्तींनी फूस लावून अल्पवयीनांना पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलिसांकडून बेपत्ता मुलांचा शोध सुरू आहे. गोवंडी परिसरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात 15 वर्षीय मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. 24 ऑगस्ट रोजी ट्युशनसाठी घराबाहेर पडलेली ही मुलगी घरी परतली नाही. कुटुंबीयांनी तिचा परिसरात तसेच नातेवाईकांकडे शोध घेतल्यानंतर पोलिसांकडे धाव घेतली.

दरम्यान, विक्रोळी पार्कसाईट परिसरातील सूर्यनगर भाजी मार्केटजवळून 13 वर्षीय सत्यजीत जाधव बेपत्ता झाला. मोबाईल रिचार्ज करण्यासाठी घराबाहेर पडलेला सत्यजीत परत न आल्याने कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. मालाड पूर्वेतील कुरार परिसरात 16 वर्षीय शिखा यादव बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. शाळेत गेल्यानंतर ती घरी परतली नसल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला. मात्र, माहिती न मिळाल्याने पोलिसांकडे तक्रार करण्यात आली. तिन्ही घटनांचा तपास सुरू असून, पोलिसांकडून विविध ठिकाणी शोधमोहीम राबवली जात आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number