‘…ही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची सुरुवात’ – डॉ. एन. के. अरोरा

देशात पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे आरोग्य प्रशासनाची चिंता वाढली असून दरम्यान टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. एन. के. अरोरा यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. देशातील प्रमुख (मेट्रो) शहरांमध्ये ७५ टक्के रुग्ण हे ओमायक्रॉनबाधित आहेत. त्यामुळे ही भारतात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची सुरूवात असल्याचे डॉ. एन. के. अरोरा यांनी सांगितले आहे. देशातील मुंबई, दिल्ली, […]

‘…ही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची सुरुवात’ – डॉ. एन. के. अरोरा

देशात पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे आरोग्य प्रशासनाची चिंता वाढली असून दरम्यान टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. एन. के. अरोरा यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. देशातील प्रमुख (मेट्रो) शहरांमध्ये ७५ टक्के रुग्ण हे ओमायक्रॉनबाधित आहेत. त्यामुळे ही भारतात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची सुरूवात असल्याचे डॉ. एन. के. अरोरा यांनी सांगितले आहे. देशातील मुंबई, दिल्ली, कोलकाता यासारख्या प्रमुख शहरांमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळले असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

भारतात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वेगाने होत आहे. तर ओमायक्रॉन रुग्णही मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. सोमवारी देशात ३३,७५० नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने जाहीर केली. डॉ. एन. के. अरोरा यांनी गर्भवती महिलांच्या लसीकरणाबाबत चिंता व्यक्त केली आहे. देशातील ४.५ कोटी गर्भवती महिलांपैकी १० टक्के महिलांनी लसीकरण करून घेतले आहे. त्यामुळे ४० कोटी गर्भवती महिलांनी अद्याप कोरोना लस घेतलेली नाही.

भारतात आतापर्यंत १७०० ओमायक्रॉन रुग्णांची नोंद झाली आहे. तर देशातील ओमायक्रॉन विषाणूचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. महाराष्ट्रात ५१० रुग्णांना ओमायक्रॉन विषाणूची बाधा झाली असल्याची माहिती टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. एन. के. अरोरा यांनी दिली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number