Cat Eradication Plan: 2050 पर्यंत ‘हा’ देश 25 लाख जंगली मांजरी नष्ट करणार; काय आहे या धक्कादायक निर्णयामागील कारण?

ही मोहीम 2016 पासून स्थानिक पक्षी, पाली आणि किटकांना धोका निर्माण करणाऱ्या आक्रमक प्रजातींचा बंदोबस्त करण्यासाठी राबवली जात आहे.<br/>
Cat Eradication Plan: 2050 पर्यंत ‘हा’ देश 25 लाख जंगली मांजरी नष्ट करणार; काय आहे या धक्कादायक निर्णयामागील कारण?

Cat Eradication Plan: न्यूझीलंड सरकारने आपल्या दुर्लभ आणि स्थानिक वन्यजीव संरक्षणासाठी एक ऐतिहासिक निर्णय घेतला असून, देशातील सर्व फेरल कॅट्स (जंगली मांजरी) 2050 पर्यंत पूर्णतः नष्ट करण्याची योजना जाहीर केली आहे. संरक्षणमंत्री तामा पोटाका यांनी जंगली मांजरांना “स्टोन कोल्ड किलर” असे संबोधित करत सांगितले की, या प्रजातींचा समावेश आता अधिकृतपणे Predator Free 2050 या राष्ट्रीय मोहिमेत करण्यात आला आहे. ही मोहीम 2016 पासून स्थानिक पक्षी, पाली आणि किटकांना धोका निर्माण करणाऱ्या आक्रमक प्रजातींचा बंदोबस्त करण्यासाठी राबवली जात आहे.

जंगली मांजरींचा जैवविविधतेवर मोठा घाला

पोटाका यांच्या म्हणण्यानुसार, पाळीव मांजरी मानवांसह राहतात, परंतु जंगली मांजरे पूर्णपणे भक्षक स्वभावाची असून जंगलात मुक्तपणे फिरतात. न्यूझीलंडच्या अनोख्या जैवविविधतेला जंगली मांजरे गंभीर धोका ठरत आहेत. अलीकडेच नॉर्थ आयलंडमधील ओहाकुने परिसरात केवळ एका आठवड्यात 100 हून अधिक लहान शेपटीच्या वटवाघळांचा बळी जंगली मांजरांनी घेतल्याचे समोर आले आहे. स्टीवर्ट आयलंडवरही सदर्न डॉटरल या दुर्मिळ पक्ष्याची प्रजाती जवळपास नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे.

हेही वाचा – Cyclone Ditwah Alert : 'दितवाह' चक्रीवादळामुळे श्रीलंकेला मोठा फटका, मृतांची संख्या 56 वर, तामिळनाडू-आंध्रप्रदेशला सतर्कतेचा इशारा

25 लाखांपेक्षा जास्त जंगली मांजरी नष्ट करण्यात येणार 

न्यूझीलंडमध्ये अंदाजे 2.5 दशलक्ष फेरल कॅट्स आहेत. या मांजरांचे वजन सरासरी 7 किलो आणि लांबी जवळपास 1 मीटरपर्यंत असते. पोटाका यांनी म्हटलं की, 'या मांजरी देशभर पसरल्या आहेत. शहरे, शेतं, जंगलं आणि किनाऱ्यावरील बेटांवरही त्यांची संख्या वाढली आहे. फक्त शिकारच नव्हे, तर त्या टोक्सोप्लाझमोसिस नावाचा घातक आजारही पसरवतात, जो डॉल्फिन, जनावरे आणि मानवांसाठी हानिकारक आहे.'

हेही वाचा – US to Review Green Cards : व्हाईट हाऊस हल्ल्यानंतर US ॲक्शन मोडवर! 19 देशांतील ग्रीन कार्ड धारकांची होणार कडक तपासणी

पाळीव मांजरी सुरक्षित

सरकारने स्पष्ट केले आहे की, पाळीव मांजरींवर कोणतीही कारवाई होणार नाही, त्या Predator Free मोहिमेचा भाग नसतील. लक्ष्य फक्त जंगली, आक्रमक मांजरींवर असेल. या मोहिमेत आतापर्यंत फेरेट, स्टोट, वीजल, उंदीर आणि पोसम यांसारख्या शिकारी प्राणी प्रजातींचा समावेश होता. परंतु आता प्रथमच एका शिकारी मांजर प्रजातीला यादीत समाविष्ट केले जात आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार, हे पाऊल उचलल्याने देशाची वारसा-परंपरा, नैसर्गिक अधिवास आणि स्थानिक प्रजातींचे अस्तित्व कायम राखता येईल.
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version