बिग बॉसच्या कॅमेऱ्यात कैद झालं सलमानचं हे कृत्य

मुंबई, १० जुलै, प्रतिनिधी : सध्या ‘बिग बॉस ओटीटी २’ चांगलाच चर्चेत आहे. याच खास कारण म्हणजे अभिनेता सलमान खान ‘बिग बॉस ओटीटीचे निवेदन करताना दिसत आहे. याआधीच्या पर्वाचे होस्टींग करण जोहरने केलं होतं. दरम्यान आता ‘बिग बॉस ओटीटी २’ सलमान खान त्याच्या खास शैलीत हिट करतोय. ‘बिग बॉस ओटीटी २’ची लोकप्रियता वाढत असताना ‘बिग […]

बिग बॉसच्या कॅमेऱ्यात कैद झालं सलमानचं हे कृत्य

मुंबई, १० जुलै, प्रतिनिधी : सध्या ‘बिग बॉस ओटीटी २’ चांगलाच चर्चेत आहे. याच खास कारण म्हणजे अभिनेता सलमान खान ‘बिग बॉस ओटीटीचे निवेदन करताना दिसत आहे. याआधीच्या पर्वाचे होस्टींग करण जोहरने केलं होतं. दरम्यान आता ‘बिग बॉस ओटीटी २’ सलमान खान त्याच्या खास शैलीत हिट करतोय.

‘बिग बॉस ओटीटी २’ची लोकप्रियता वाढत असताना ‘बिग बॉस ओटीटी २’चा एक धक्कादायक व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झालाय. या व्हिडीओत सलमान खान चक्क नॅशनल कॅमेरासमोर सिगरेट ओढताना दिसतोय. अलीकडेच झालेल्या विकेंडच्या वारमध्ये सलमानने सिगारेट पकडलेली दिसली.

वीकेंड का वारमध्ये सलमानने साहजिकच प्रत्येक स्पर्धकाला जो सल्ला द्यायचा होता तो दिला. पण तो बिग बॉस शो आहे जिथे असंख्य कॅमेरा लागले असतात.
अशाच एका कॅमेराने एका क्लिपला पकडण्यात यश मिळविले. या क्लिकमध्ये सलमानने हातात सिगारेट धरलेली दिसतेय.

एका युजरने लिहिले, “आम्हाला माहित आहे की सलमान ढोंगी आहेच. पण सलमान जर इतरांना व्याख्यान देत असेल तर किमान त्यांच्यासमोर तरी चांगलं वागायचं.”

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number