.. तर १४ वर्षे तुरुंगात राहायला तयार – नवनीत राणा

खासदार नवनीत राणा यांना लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी रुग्णालयाबाहेर गर्दी केली होती. रुग्णालयातून बाहेर पडताना नवनीत यांच्या हातात हनुमान चालिसा दिसली. समर्थकांनी भगवी शाल, हनुमान चालिसेची प्रत आणि हनुमानाची प्रतिमादेखील नवनीत राणा यांना भेट देण्यात आली आणि औक्षणही करण्यात आलं. यावेळी माध्यमांशी बोलताना नवनीत राणा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘१४ वर्ष […]

.. तर १४ वर्षे तुरुंगात राहायला तयार – नवनीत राणा

खासदार नवनीत राणा यांना लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी रुग्णालयाबाहेर गर्दी केली होती. रुग्णालयातून बाहेर पडताना नवनीत यांच्या हातात हनुमान चालिसा दिसली. समर्थकांनी भगवी शाल, हनुमान चालिसेची प्रत आणि हनुमानाची प्रतिमादेखील नवनीत राणा यांना भेट देण्यात आली आणि औक्षणही करण्यात आलं. यावेळी माध्यमांशी बोलताना नवनीत राणा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

‘१४ वर्ष तुरूंगात राहायला तयार’

अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांना रविवारी लिलावती रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. नवनीत राणा ज्यावेळी लिलावती रुग्णालयातून बाहेर आल्या, त्यावेळी त्यांच्या हातात हनुमान चालीसा होती. आल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्याचबरोबर माझ्याविरुद्ध निवडणूक लढवावी असं आव्हानंही राणांनी यावेळी दिलं. ‘हनुमान चालीस पठण केल्याप्रकरणात १४ दिवस नाही, तर १४ वर्ष तुरुंगात राहायला तयार आहे, असेही त्या म्हणाल्या.

‘मी मुख्यमंत्र्यांना आव्हान देते की…’

रुग्णालयातून बाहेर येताच नवनीत राणांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. माध्यमांशी संवाद साधत असतांना नवनीत राणा म्हणाल्या की, ‘जनतेमधून निवडणूक लढून विजयी होऊन दाखवा. महाराष्ट्रातील कोणताही जिल्हा निवडा, तुमच्यासमोर एक महिला उभी राहून लढून दाखवेल.’ असे त्या म्हणाल्या. तसेच रामाच्या आणि हनुमानाच्या नावावर ज्याप्रकारे माझ्यावर अत्याचार केला त्याचे उत्तर महाराष्ट्राची जनता यांना नक्की देईल, असेही राणा म्हणाल्या.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number