राज ठाकरेंच्या सभेला मिळालं मैदान

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ६ मे रोजी रत्नागिरीत जाहीर सभा होणार आहे. मनसेचे ही सभा रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या जवाहर मैदानावर घेण्याचं ठरवलं होतं. परंतु शुक्रवारी या ठिकाणी सभा घेण्यासाठी मनसेने विचारणा केली असता त्यांना नकार मिळाला. त्यामुळे आता मनसेची जाहीर सभा कै. प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे पार पडणार आहे. राज ठाकरे यांची सभा […]

राज ठाकरेंच्या सभेला मिळालं मैदान

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ६ मे रोजी रत्नागिरीत जाहीर सभा होणार आहे. मनसेचे ही सभा रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या जवाहर मैदानावर घेण्याचं ठरवलं होतं. परंतु शुक्रवारी या ठिकाणी सभा घेण्यासाठी मनसेने विचारणा केली असता त्यांना नकार मिळाला. त्यामुळे आता मनसेची जाहीर सभा कै. प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे पार पडणार आहे.

राज ठाकरे यांची सभा रत्नागिरीतील सभा गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे जवाहर मैदान येथे पार पडणार होती. याच पार्श्वभूमीवर मनसे नेते नितीन सरदेसाई शुक्रवारी रत्नागिरी दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी सभास्थळाची पाहणी केली. मात्र, सभास्थळ हे शैक्षणिक संस्था असल्याने राजकीय सभांसाठी मैदान देत नसल्याचे संस्थेकडून सांगण्यात आले. गेली दहा वर्षे हे मैदान राजकीय सभेसाठी देण्यात आले नाही. तसेच, सभेची परवानगी घेण्यासाठी मनसेकडून कोणीही नेते,  कार्यकर्ते आले नसल्याचेही सांगण्यात आले.

त्यानंतर नितीन सरदेसाई यांनी सभेसाठी दुसरी जागा शोधली. मनसेच्या सभेसाठी रत्नागिरीतील आठवडा बाजार येथील कै. प्रमोद महाजन क्रीडा संकुल ही जागा निश्चित  केली आहे. या जागेची नितीन सरदेसाई आणि पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली आहे. त्यामुळे आता, राज ठाकरे यांची ६ मे रोजी रत्नागिरीत होणारी सभा गोगटे- जोगळेकर महाविद्यालयाचे जवाहर मैदान येथे न होता कै. प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे पार पडणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number