जगातील सर्वात उंच मंदिर झुकू लागले

मुंबई, १७ मे २०२३, प्रतिनिधी : देवभूमी म्हणून प्रसिद्ध असलेले उत्तराखंड या राज्यात धार्मिक ठेवा जपणारी अनेक मंदिरे आहेत. या प्रदेशात बर्फाच्छादित भागात देखील शिव शंकराची अनेक मंदिरे आहेत. टग्यातील एक म्हणजे जगातील सर्वात उंच ठिकाणी असलेले तुंगनाथ शिव मंदिर. परंतु आता हे मंदिर धोक्यात सापडले आहे. उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग येथील जगातील सर्वांत उंचीवर असलेले तुंगनाथ […]

जगातील सर्वात उंच मंदिर झुकू लागले

मुंबई, १७ मे २०२३, प्रतिनिधी : देवभूमी म्हणून प्रसिद्ध असलेले उत्तराखंड या राज्यात धार्मिक ठेवा जपणारी अनेक मंदिरे आहेत. या प्रदेशात बर्फाच्छादित भागात देखील शिव शंकराची अनेक मंदिरे आहेत. टग्यातील एक म्हणजे जगातील सर्वात उंच ठिकाणी असलेले तुंगनाथ शिव मंदिर. परंतु आता हे मंदिर धोक्यात सापडले आहे.

उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग येथील जगातील सर्वांत उंचीवर असलेले तुंगनाथ शिव मंदिर झुकू लागले आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने केलेल्या निरीक्षणात ही बाब समोर आली आहे. या निरीक्षणानुसार तुंगनाथ मंदिर ५ ते ६ अंशाने तर आणि परिसरातील व आत असलेल्या मूर्ती आणि छोट्या छोट्या संरचना १० अंशांपर्यंत झुकल्या आहेत. याचबरोबर मंदिराखालचा भाग खचण्याची भितीही एआयएस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. आता याबाबत केंद्र सरकारला माहिती देण्यात आली असून संरक्षित इमारत म्हणून जाहीर करण्याची मागणी तज्ञांनी केली आहे.

पुरातत्व विभागाचा अहवाल प्राप्त होताच केंद्र सरकारने मंदिर राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण असल्याचा दाखला दिला आहे. लवकरच या मंदिराला संरक्षित स्मारक घोषित करण्यात येणार आहे. सध्यातरी या मंदिराला नेमक्या कोणत्या कारणामुळं नुकसान पोहोचले आहे याचे कारण शोधले जात आहे. जेणेकरुन तातडीने मंदिराच्या संवर्धनासाठी योग्य ते प्रयत्न करता येतीलमी,असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number