शाहांच्या उपस्थितीत पालिका निवडणुकीची रणनीती ?

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शनिवार आणि रविवार अशा दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत.राज्यातील सत्ता परिवर्तन आणि एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर गृहमंत्री शाह यांचा हा दुसरा मुंबई दौरा आहे. महाराष्ट्रातील भाजपच्या निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे राज्य भाजप पदाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. मुंबईत […]

शाहांच्या उपस्थितीत पालिका निवडणुकीची रणनीती ?

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शनिवार आणि रविवार अशा दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत.राज्यातील सत्ता परिवर्तन आणि एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर गृहमंत्री शाह यांचा हा दुसरा मुंबई दौरा आहे. महाराष्ट्रातील भाजपच्या निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे राज्य भाजप पदाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत.

मुंबईत पोहोचल्यानंतर शहा हे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या आईच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करतील, त्यानंतर ते सह्याद्री अतिथीगृहात जातील, तिथे सायंकाळी उशिरा ते आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसंदर्भात बैठक घेणार,अधिकाऱ्यांची बैठक घेणार.

या बैठकीत शहा पदाधिकाऱ्यांना मुंबई महापालिका निवडणुकीत विजयी करण्याचा मंत्र देणार ? त्यासोबतच निवडणुकीची कोणती तयारी सुरू आहे, याबाबत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली जाणार आहे.तरीही मुंबई महापालिकेची निवडणुकांची घोषणा झालेली नाही मात्र निवडणुकीपूर्वी अमित शहा यांचा मुंबई दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.कारण राज्यात सत्तेत आल्यानंतर अमित शहांना उद्धव ठाकरेंच्या पक्षाला मुंबई महापालिकेच्या सत्तेतून हद्दपार करायचे आहे.अमित शाह महाराष्ट्र भूषण सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. खारघरमध्ये राज्य सरकारतर्फे आयोजित पुरस्कार कार्यक्रम, त्यानंतर ते परतणार आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number