राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसाचा परिणाम रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील वाहतूकीवर देखील झाल्याचं पाहायला मिळत आहे.: रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावरील रस्ता खचल्याने या महामार्गावरील वाहतुकीवर गुरुवार रात्रीपासून माेठा परिणाम झाला आहे. शुक्रवार सकाळपासून या महामार्गावरील वाहतुक धिम्या गतीने सुरु आहे. या महामार्गावर बहुतांश ठिकाणी छोटे माोठे खड्डे पडले आहेत. यामुळे महामार्गावरुन प्रवास करणा-यांचे हाल हाोत आहेत.रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यातपावसामुळे रस्त्यांची बिकट अवस्था झाली आहे.
या रस्त्यावर नाणीज जवळ गुरुवारी रात्री रस्ता खचला. सध्या मिऱ्या ते नागपूर जाणाऱ्या या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम आहे सुरु. रात्री साडेबारा वाजल्यापासून कोल्हापूरकडे आणि रत्नागिरीकडे येणारी वाहतुक ठप्प झाली होती. खचलेल्या रस्त्याच्या ठिकाणी ठेकेदाराकडून तात्पुरती उपाययोजना करण्यात आली. रत्नागिरी आणि काेल्हापूर जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरुच आहे. पावसामुळे रस्त्यांची बिकट अवस्था झाली आहे. पहिल्याच पावसाचा फटका रत्नागिरी काेल्हापूर महामार्गावरील रस्त्याला देखील बसला आहे. या महामार्गावर बहुतांश ठिकाणी छाेटे माेठे खड्डे पडले आहेत. यामुळे महामार्गावरुन प्रवास करणा-यांचे हाल होत आहेत.
पावसामुळे राज्य महामार्ग क्रमांक १६६ पाली ते साखरपा गाव दरम्यान नाणीज येथील माध्यमिक शाळेसमोरील रस्ता खचल्याने राज्य महामार्ग रस्त्याची दुरुस्ती होईपर्यंत वाहतुक बंद करण्यात आली आहे. मुंबई व रत्नागिरीकडून कोल्हापूरच्या दिशेने जाणारी वाहतूक पाली पासून लांजा – दाभोळ मार्गे कोल्हापूर दिशेने वळविण्यात आलेली आहे कोल्हापूरकडून येणारी वाहतूक दाभोळ फाटा – लांजा – मार्गाने वळविण्यात आलेली आहे.