राणा दाम्पत्याची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानासमोर हनुमान चालीसा पठण करण्याच्या अट्टाहसापोटी राणा दाम्पत्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने राणा दाम्पत्याची याचिका फेटाळली आहे. आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांना अटक करण्यात आली असून राणा दाम्पत्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तसेच मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्यांवर १२४ (अ) आणि ३५३ अन्वये […]

राणा दाम्पत्याची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानासमोर हनुमान चालीसा पठण करण्याच्या अट्टाहसापोटी राणा दाम्पत्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने राणा दाम्पत्याची याचिका फेटाळली आहे.

आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांना अटक करण्यात आली असून राणा दाम्पत्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तसेच मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्यांवर १२४ (अ) आणि ३५३ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याविरोधात दोन स्वतंत्र एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे दोन एफआयआरविरोधात राणा दाम्पत्याने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी पार पडली असून उच्च न्यायालयाने राणा दाम्पत्याची याचिका फेटाळली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने राणा दाम्पत्याची १२४ (अ) प्रकरणी गुन्हा रद्द करण्याची मागणी फेटाळली आहे. तसेच राणा दाम्पत्याल कलम ३५३ प्रकरणात दिलासा दिला आहे. दरम्यान, आरोपींना ७२ तासापूर्वी नोटीस देणं आवश्यक असून दोन घटनांचे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करा, असे निर्देश न्यायलयाने नोंदवले आहेत.

राणा दाम्पत्य यांच्या याचिकेवर आज सुनावणी पार पडली. यावेळी राणा दाम्पत्य यांचे वकील रिझवान मर्चंट यांनी युक्तिवाद लढवला. तसेच सरकारी वकील प्रदीप घरत यांनी राणा प्रकरणावर युक्तिवाद लढवला.

राणा दाम्पत्याचे वकील रिझवान मर्चंट यांचा युक्तिवाद

एका प्रकरणावर २ एफआयआर करणं बेकायदेशीर.
घटना एकच आहे तर दोन एफआयआर का?
राणांचे वकील रिझवान मर्चंट यांचा युक्तिवाद.
पोलिसांनी १४९ सीआरपीसी अंतर्गत नोटीस बजावली.
दोघे घराबाहेर पडलेच नाही.
गोंधळ त्यांनी केला, गुन्हा राणा दाम्पत्यावर दाखल झाला.

राणा प्रकरणावर सरकारी वकील प्रदीप घरत यांचा युक्तिवाद

 हनुमान चालीसा पठण करण्यासाठी एफआयआर नाही.
दोघांनी पोलिसांशी गैरवर्तन केले.
पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला.
दोघांच्या वर्तवणूकीमुळे कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण.
तपास हा बाकी असल्याने गुन्हा दाखल करतेवेळी १२४ कलम लावले नाही.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number