धुळ्यात भाजीपाल्याचे दर कडाडले

धुळे,१९ जुलै २०२३: धुळे शहरामध्ये येणाऱ्या होलसेल भाजीवाल्यांची आवक कमी झाल्याने त्याचा परिणाम थेट भाववाढीवर झाला आहे. शहरातील भाजी मार्केट तसेच तालुक्यातील आठवडी बाजारात भाज्या ५० ते ८० रुपये किलोने विकल्या जात आहेत. गेल्या आठवड्यात भरपूर वारे वाहत असल्यामुळे त्यामुळे भाजीपाल्याचे उत्पादन घटले आहे. आणि भाजीपाल्याची अवाक मोठ्या प्रमाणात कमी झाली. टोम्याटो पाठोपाठ आता धुळे […]

धुळ्यात भाजीपाल्याचे दर कडाडले

धुळे,१९ जुलै २०२३: धुळे शहरामध्ये येणाऱ्या होलसेल भाजीवाल्यांची आवक कमी झाल्याने त्याचा परिणाम थेट भाववाढीवर झाला आहे. शहरातील भाजी मार्केट तसेच तालुक्यातील आठवडी बाजारात भाज्या ५० ते ८० रुपये किलोने विकल्या जात आहेत. गेल्या आठवड्यात भरपूर वारे वाहत असल्यामुळे त्यामुळे भाजीपाल्याचे उत्पादन घटले आहे. आणि भाजीपाल्याची अवाक मोठ्या प्रमाणात कमी झाली.

टोम्याटो पाठोपाठ आता धुळे जिल्ह्यामध्ये सर्वच भाजीपाल्याचे दर वाढले आहेत. यंदा जिल्ह्यामध्ये पावसाळा उशिरा सुरू झाल्यामुळे हिरव्या भाज्यांचे दर वाढल्याचे विक्रेते सांगत आहेत. त्यामुळे मालाला उठाव कमी होत असल्याचं भाजीविक्रेत्यांच म्हणणं आहे. जिल्ह्यामध्ये यावर्षी जुलै महिना अर्धा संपून ही पुरेसा पाऊस पडलेला नाही. नदी नाले अजूनही कोरडे आहेत. त्यामुळे त्याचा दुष्परिणाम भाजीपाला पिकांवर झालेला आहे.

भाजीपाला पिकं वेळेवर न निघाल्यामुळे दर वाढले आहेत. गेल्या आठवड्याभरामध्ये सर्वच भाजीपाल्याच्या दरामध्ये १५ टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याचा विक्रेते सांगत आहेत. महागडा भाजीपाला हा गृहिणींचं बजेट बिघडवणारा ठरत आहे. त्यामुळे भाजीपाल्याला उठाव नसल्याचा ही व्यापारी सांगत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number