Jalgaon Crime : ‘माझ्या मुलाला नग्न करून मारलं, तसचं आरोपीसोबत घडावं…’, पीडित तरुणाच्या आईला अश्रू अनावर; मंत्री पाटील यांनी दिले कठोर कारवाईचे आश्वासन

जळगाव : जळगावच्या भुसावळमध्ये अमानुष मारहाण झालेल्या पीडित तरुणाच्या आईने मंत्री गुलाबराव पाटलांची भेट घेतली. मंत्री गुलाबराव पाटील यांना मोबाईलमधील व्हिडीओ दाखवून घटना सांगताना पीडित तरुणाच्या आईला अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. माझ्या मुलाला ज्या पद्धतीने…नग्न करून अमानुष मारहाण केली, तेच मारहाण करणाऱ्या तरुणासोबत घडावं. त्याच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पीडित तरुणाच्या आईने मंत्री गुलाबराव पाटील […]

Jalgaon Crime : ‘माझ्या मुलाला नग्न करून मारलं, तसचं आरोपीसोबत घडावं…’, पीडित तरुणाच्या आईला अश्रू अनावर; मंत्री पाटील यांनी दिले कठोर कारवाईचे आश्वासन

जळगाव : जळगावच्या भुसावळमध्ये अमानुष मारहाण झालेल्या पीडित तरुणाच्या आईने मंत्री गुलाबराव पाटलांची भेट घेतली. मंत्री गुलाबराव पाटील यांना मोबाईलमधील व्हिडीओ दाखवून घटना सांगताना पीडित तरुणाच्या आईला अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. माझ्या मुलाला ज्या पद्धतीने…नग्न करून अमानुष मारहाण केली, तेच मारहाण करणाऱ्या तरुणासोबत घडावं. त्याच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पीडित तरुणाच्या आईने मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे करत लेखी निवेदन दिले. घाबरू नका, रडू नका , मी तुमच्या पाठीशी आहे, असे म्हणत आरोपींवर कठोर कारवाईचे आश्वासन यावेळी मंत्री गुलाबराव पाटलांनी दिले. अशा पद्धतीने मारहाण करण्याचा अधिकार कुणालाही नाही, असे म्हणत कडक कारवाई करण्याचे आदेश गुलाबराव पाटलांनी पोलीस अधीक्षकांना दिले. चार महिन्यांपासून न्याय मिळावा म्हणून फिरत आहे. पण बातम्या आल्यानंतर पोलीस जागे झाले. पत्रकारांचे आभार मानते, अशी प्रतिक्रिया पीडित तरुणाच्या आईने दिली.

हेही वाचा : BSNL Recharge Offer: फक्त एका रुपयात अनलिमिटेड कॉलिंग अन् डेली डेटा! बीएसएनएलची ‘फ्रीडम 2.0’ ऑफर जाहीर

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number