पैशाचा पाऊस अन् गुप्तधनाचे आमिष! दुर्मिळ कासवाची तस्करी करणारी आंतरराज्यीय टोळी जाळ्यात; LCB कडून 5 जण जेरबंद

छत्रपती संभाजीनगर : गुप्तधन शोधणे आणि पैशांचा पाऊस पाडण्याच्या अघोरी प्रथेसाठी दुर्मीळ कासवाची बेकायदेशीर तस्करी करणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीचा छत्रपती संभाजीनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. सिल्लोडमार्गे अर्टिगा कारमधून दुर्मिळ कासवाची वाहतूक करणाऱ्या 5 तस्करांना पोलिसांनी पाथरी टोलनाक्याजवळ शिताफीने सापळा रचून ताब्यात घेतले आहे. या कारवाईत अझ्तर खान पठाण (रा. सुरत, गुजरात), शेख अब्रार […]

पैशाचा पाऊस अन् गुप्तधनाचे आमिष! दुर्मिळ कासवाची तस्करी करणारी आंतरराज्यीय टोळी जाळ्यात; LCB कडून 5 जण जेरबंद

छत्रपती संभाजीनगर : गुप्तधन शोधणे आणि पैशांचा पाऊस पाडण्याच्या अघोरी प्रथेसाठी दुर्मीळ कासवाची बेकायदेशीर तस्करी करणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीचा छत्रपती संभाजीनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. सिल्लोडमार्गे अर्टिगा कारमधून दुर्मिळ कासवाची वाहतूक करणाऱ्या 5 तस्करांना पोलिसांनी पाथरी टोलनाक्याजवळ शिताफीने सापळा रचून ताब्यात घेतले आहे. या कारवाईत अझ्तर खान पठाण (रा. सुरत, गुजरात), शेख अब्रार अहमद, साबीर खान मेवाती, शेख मुख्तार आणि सय्यद अब्रार अली (सर्व रा. जळगाव जिल्हा) या 5 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. अंधश्रद्धेपायी पैशांचा पाऊस पाडणे आणि गुप्तधनाच्या आमिषातून ही तस्करी केली जात असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी वडोदबाजार पोलीस ठाण्यात वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा : Sambhajinagar Accident : भीषण अपघात! भरधाव कंटनेर मिरवणुकीत घुसला, दुचारीस्वारांना चिरडत गेला; 2 शेतकरी ठार, तर 12 जण जखमी

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number