Wardha Tiger Attack : वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या शेतकऱ्यावर अखेर 7 दिवसांनंतर अंत्यसंस्कार; कुटुंबीयांची प्रशासनाच्या विनंतीला सहमती

वर्धा : वर्ध्याच्या रायपूर जंगली येथील वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या भगवान धुर्वे यांच्या अंत्यसंस्काराचा सात दिवसांपासून रखडलेला प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांच्या उपस्थितीत कुटुंबीय आणि ग्रामस्थांसोबत झालेल्या बैठकीत विविध मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली. शासनाच्या नियमानुसार 25 लाखांची मदत, विशेष बाब म्हणून अतिरिक्त मदतीचा प्रस्ताव, कुटुंबातील एका व्यक्तीला वनविभागात हंगामी रोजगार आणि पुनर्वसनासह इतर […]

Wardha Tiger Attack :  वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या शेतकऱ्यावर अखेर 7 दिवसांनंतर अंत्यसंस्कार; कुटुंबीयांची प्रशासनाच्या विनंतीला सहमती

वर्धा : वर्ध्याच्या रायपूर जंगली येथील वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या भगवान धुर्वे यांच्या अंत्यसंस्काराचा सात दिवसांपासून रखडलेला प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांच्या उपस्थितीत कुटुंबीय आणि ग्रामस्थांसोबत झालेल्या बैठकीत विविध मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली. शासनाच्या नियमानुसार 25 लाखांची मदत, विशेष बाब म्हणून अतिरिक्त मदतीचा प्रस्ताव, कुटुंबातील एका व्यक्तीला वनविभागात हंगामी रोजगार आणि पुनर्वसनासह इतर मागण्यांवर कार्यवाहीचे आश्वासन देण्यात आले. दरम्यान, खासदार अमर काळे यांच्या हस्ते कुटुंबियांना मदतीचा धनादेश देण्यात आला. प्रशासनाच्या विनंतीनंतर कुटुंबीयांनी अंत्यसंस्कारास सहमती दर्शवली असून आज, सकाळी 11 वाजता भगवान धुर्वे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

हेही वाचा : Pune Firing : पुण्यात नक्की चाललंय काय? पुन्हा तरुणांकडून गोळीबार; पोलिसांकडून 6 जणांना अटक

वर्ध्याच्या सेलू तालुक्यातील रायपूर जंगली या गावात 9 सप्टेंबरला भगवान चंद्रभान धुर्वे या शेतकऱ्याचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. त्या दिवशी सायंकाळी उशीरा ही घटना उजेडात आली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मृतदेहाचे शवविच्छेदन करून त्यास गावात पाठविण्यात आले. अंत्यसंस्कारासाठी मदत म्हणून शासनाचे 25 हजार रुपये पीडित कुटुंबाने स्वीकारले. मात्र नंतर पीडित कुटुंबातील एकाला नोकरी आणि एक कोटी रुपये नुकसानभरपाई, अशी मागणी गावाकऱ्यांनी रेटून धरली. म्हणून मग मृतदेह परत सेलू रुग्णालयात पाठविण्यात आला. दरम्यान, गेल्या सात दिवसांपासून धुर्वे यांच्यावर अंत्यसंस्कार झाले नसून अखेर ते आज होत आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number