महाराष्ट्रच्या दीपा आंबेकरांनी न्यूयॉर्कमध्ये पटकावले ‘न्यायाधीशपद’

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई मराठमोळ्या दीपा आंबेकरांनी न्यूयॉर्कमध्ये आपली एक वेगळीच ओळख निमार्ण केली आहे. दीपा आंबेकरांची न्यूयॉर्क शहरात दिवाणी न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मूळ चेन्नईच्या राजा राजेश्वरी या भारतीय अमेरिकन न्यायाधीश महिलेनंतर आंबेकर या भारतीय वंशाच्या दुसऱ्या महिला न्यायाधीश ठरल्या आहेत. न्यूयॉर्कचे महापौर बिल डे ब्लासिओ यांच्या कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात […]

महाराष्ट्रच्या दीपा आंबेकरांनी न्यूयॉर्कमध्ये पटकावले ‘न्यायाधीशपद’

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मराठमोळ्या दीपा आंबेकरांनी न्यूयॉर्कमध्ये आपली एक वेगळीच ओळख निमार्ण केली आहे. दीपा आंबेकरांची न्यूयॉर्क शहरात दिवाणी न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मूळ चेन्नईच्या राजा राजेश्वरी या भारतीय अमेरिकन न्यायाधीश महिलेनंतर आंबेकर या भारतीय वंशाच्या दुसऱ्या महिला न्यायाधीश ठरल्या आहेत.

न्यूयॉर्कचे महापौर बिल डे ब्लासिओ यांच्या कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात दीपा आंबेकर यांच्या नियुक्तीची माहिती देण्यात आली आहे. आंबेकर यांची दिवाणी न्यायालयात नियुक्ती करण्यात आली असून त्या फौजदारी न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम पाहतील, आंबेकर यांच्याबरोबरच कौटुंबिक न्यायालयातील 3 न्यायाधीशांची नियुक्तीही करण्यात आल्याचे या पत्रकात सांगितले आहे.

दीपा आंबेकर न्यूयॉर्कमधील प्रथम महाराष्ट्रीय, तर तिसऱ्या भारतीय स्त्री न्यायाधीश ठरल्या आहेत. आंबेकर यांनी न्यूयॉर्क शहर परिषदेवर 3 वर्षे वरिष्ठ पदावर काम केलं असून, त्यांनी नागरी सुरक्षा समितीवर सल्लागार म्हणूनही काम केलं आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number