आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर

  बीडमध्ये आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. बीडमधील आरोग्य विभागाच्या एका विद्यार्थ्याला ३३ ठिकाणी परीक्षा केंद्र जाहीर झाल्यामुळे आर्श्चय व्यक्त केले जात आहे. त्यामुळे आरोग्य विभाग परीक्षांच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले आहेत.   ३१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या आरोग्य विभागाच्या गट-ड परीक्षेसाठी अर्ज भरलेल्या पृथ्वीराज गोरे या विद्यार्थ्याला ३३ ठिकाणी परिक्षा केंद्र […]

आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर

  बीडमध्ये आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. बीडमधील आरोग्य विभागाच्या एका विद्यार्थ्याला ३३ ठिकाणी परीक्षा केंद्र जाहीर झाल्यामुळे आर्श्चय व्यक्त केले जात आहे. त्यामुळे आरोग्य विभाग परीक्षांच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले आहेत.

  ३१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या आरोग्य विभागाच्या गट-ड परीक्षेसाठी अर्ज भरलेल्या पृथ्वीराज गोरे या विद्यार्थ्याला ३३ ठिकाणी परिक्षा केंद्र देण्यात आली आहेत. त्यामुळे पृथ्वीराज गोंधळून गेला असून परीक्षेसाठी ३३ परीक्षाकेंद्रे आल्याने नेमके कोणत्या केंद्रावर जायचे? तसेच बीड केंद्रावर परीक्षा दिल्याने इतर केंद्रांवर गैरहजेरी पडणार आहे. त्यामुळे दिलेला पेपर ग्राह्य धरला जाईल का? असे प्रश्न पृथ्वीराजला पडले आहेत.

  पृथ्वीराज गोरे या विद्यार्थ्याने औरंगाबाद आरोग्य विभागासाठी अर्ज भरला होता. तसेच या परिक्षेसाठी त्याने ६८० रुपये परिक्षा शुल्कदेखील भरले आहे. मात्र ३१ ऑक्टबर रोजी होणाऱ्या आरोग्य विभागाच्या परिक्षेसाठी पृथ्वीराजला ३३ परीक्षा केंद्र देण्यात आली आहेत. त्यामुळे परीक्षा तात्काळ रद्द करून एमपीएससीच्या माध्यमातून परीक्षा घेण्यात यावा, अशी मागणी पृथ्वीराज गोरे या विद्यार्थ्याने केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number