‘महाविकास आघाडी का हाथ, अंडरवर्ल्ड के साथ!’ – चित्रा वाघ

  क्रुझवरील ड्रग्जप्रकरणाचा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा संबंध असल्याचा आरोप राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केले होते. मात्र फडणवीसांनी मलिकांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. दरम्यान आज फडणवीसांनी पत्रकार परिषद घेत मलिकांवर आरोप केले आहेत. मलिकांचा संबंध अतिरेकींसोबत असल्याचा आरोप फडणवीसांनी केला आहे. त्यामुळे आता भाजप नेत्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. […]

‘महाविकास आघाडी का हाथ, अंडरवर्ल्ड के साथ!’ – चित्रा वाघ

  क्रुझवरील ड्रग्जप्रकरणाचा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा संबंध असल्याचा आरोप राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केले होते. मात्र फडणवीसांनी मलिकांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. दरम्यान आज फडणवीसांनी पत्रकार परिषद घेत मलिकांवर आरोप केले आहेत. मलिकांचा संबंध अतिरेकींसोबत असल्याचा आरोप फडणवीसांनी केला आहे. त्यामुळे आता भाजप नेत्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

  भाजप नेत्यांकडून आता शिवसेनेला लक्ष्य केले जात आहे. चित्रा वाघ यांनी सांगितले की, ‘बॉम्ब हल्ल्यात ज्या निष्पाप जीवांचे बळी गेले आहेत त्यांच्या कुटुंबियांशी, महाराष्ट्राच्या जनतेशी, मराठी माणसाशी या सरकारने केलेला विश्वासघात आहे. नागरिकांच्या पाठीत महाविकास आघाडीकडून खंजीर खुपसला गेला आहे, अशी टीका चित्रा वाघ यांनी केला आहे. ‘महाविकास आघाडी का हाथ, अंडरवर्ल्ड के साथ!’, असे ट्विट करत चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

  तसेच भाजप नेते यांनीही शिवसेनेवर टीका केली आहे. ‘शिवसेनेला आता बॉम्बस्फोट आरोपींशी झालेल्या व्यवहाराचे समर्थन करावे लागणार… काय करणार, सत्ता टिकवायची आहे ना!’, असे ट्विट भातखळकर यांनी केले आहे.

देवेंद्र फडणवीसांचे आरोप

  नवाब मलिकांनी बॉम्बस्फोटातील आरोपींकडून जमीन खरेदी केल्याचा आरोप देवेंद्र फडणवीसांनी मलिकांवर केला आहे. त्यामुळे मुंबईच्या खुन्यांकडून जमीन घेण्याची गरज काय? असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केला आहे. तसेच जमीन कावडीमोलाने मलिकांना का मिळाली? टाडा आरोपींची संपत्ती सरकारजमा का नाही? आणि जमिनीच्या व्यवहारात काळा पैसा वापरला? असे प्रश्न देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेत उपस्थित केले आहेत.याबाबतचे सर्व पुरावे राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना देणार असल्याचे फडणवीसांनी सांगितले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number