Tukaram Mundhe FDA : समोसा अन् लस्सी खाणं पडू शकतं महागात! FDA च्या तपासणीत धक्कादायक प्रकार समोर; दोन प्रसिद्ध हॉटेल्सवर मोठी कारवाई

तुकारम मुंढे यांनी मुंबईतील मालाड येथील प्रसिद्ध दिल्ली स्वीट अँड भेळपुरी हाऊस आणि कुर्ल्यातील गुलझार मोहम्मदी हॉटेल या दोन मोठ्या हॉटेल्सचे परवाने तात्काळ निलंबित केले आहेत.

Tukaram Mundhe FDA : समोसा अन् लस्सी खाणं पडू शकतं महागात! FDA च्या तपासणीत धक्कादायक प्रकार समोर; दोन प्रसिद्ध हॉटेल्सवर मोठी कारवाई

महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) अन्नसुरक्षा कायद्याची पायमल्ली करणाऱ्या आस्थापनांविरोधात सुरू केलेली कठोर मोहीम अधिक तीव्र केली आहे. आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यापासून राज्यभरात खाद्यपदार्थ विक्रेते आणि उपाहारगृहांची कसून तपासणी सुरू आहे. राज्यात एकीकडे अन्न व औषध प्रशासन विभागाकडून कारवाईचा धडाका सुरू असून भेसळयुक्त पदार्थ आणि अस्वच्छतासह खाद्यपदार्थांसदर्भातील मानांकन न पाळणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. त्यातूनच, अनेक हॉटेल्स आणि दुकानांना सील ठोकण्यात आल्याचंही पाहायला मिळालं. त्यामुळे, अधिकारी तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धसका अनेकांना घेतला आहे. 

हेही वाचा- Tukaram Mundhe FDA : तुकाराम मुंढेंच्या आदेशाला तुर्तास ब्रेक! फडणवीसांनी दिली सुट्या तेलाच्या विक्रीवर मुदतवाढ; नियमांमध्ये नेमका काय बदल?

अशातच तुकारम मुंढे यांनी मुंबईतील मालाड येथील प्रसिद्ध दिल्ली स्वीट अँड भेळपुरी हाऊस आणि कुर्ल्यातील गुलझार मोहम्मदी हॉटेल या दोन मोठ्या हॉटेल्सचे परवाने तात्काळ निलंबित केले आहेत. मुंबईतील खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) कारवाईचा बडगा उगारला असून अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोठी धडक मोहीम राबवण्यात आली. यावेळी मालाड (पश्चिम) येथील स्टेशन रोडवर असलेल्या 'दिल्ली स्वीट अँड भेळपुरी हाऊस'मध्ये अन्नपदार्थ तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे पाणी अशुद्ध असल्याचे आढळले.

तसेच समोसे देखील गंभीर अस्वच्छ आणि उघड्यावर ठेवल्याचे एफडीएच्या निदर्शनास आले. याव्यतिरिक्त लेबल नसलेले पनीर आणि एक्सपायरी डेट (वापराची मुदत) नसलेला लस्सीचा साठा अधिकाऱ्यांनी तात्काळ जप्त केला. नियमभंग आढळून आल्याने एफडीएने 'दिल्ली स्वीट अँड भेळपुरी हाऊस' चा परवाना रद्द केला. कुर्ला येथील प्रसिद्ध 'गुलझार मोहम्मदी हॉटेल' येथे तपासणीदरम्यान अस्वच्छता व झुरळांचा प्रादुर्भाव आढळला. तपासणीदरम्यान या हॉटेलची स्थिती अत्यंत खराब असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे येथे अन्नपदार्थांचे उत्पादन, साठवणूक, विक्री आणि वितरणावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number