का होते ‘इथे’ रावणाची पूजा?

अवघ्या भारतवर्षात मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाची पूजा होणे आणि त्याचा शत्रू म्हणून खलनायकत्व मिळालेल्या रावणाची हेटाळणी होणे,यात आश्चर्य ते काय? परंतु,अकोला जिल्ह्यातील सांगोळा त्यालाअपवाद आहे. येथे रावणाच्या सद्गुणांमुळे येथे रावणाची पूजा केली जाते. तब्बल 200 वर्षांपासून ही परंपरा जोपासली जात आहे.     वाईट ते सोडावे आणि चांगले ते घ्यावे, अशी शिकवण आपल्या संस्कृतीने दिली आहे. […]

का होते ‘इथे’ रावणाची पूजा?

अवघ्या भारतवर्षात मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाची पूजा होणे आणि त्याचा शत्रू म्हणून खलनायकत्व मिळालेल्या रावणाची हेटाळणी होणे,यात आश्चर्य ते काय? परंतु,अकोला जिल्ह्यातील सांगोळा त्यालाअपवाद आहे. येथे रावणाच्या सद्गुणांमुळे येथे रावणाची पूजा केली जाते. तब्बल 200 वर्षांपासून ही परंपरा जोपासली जात आहे.

 

 

वाईट ते सोडावे आणि चांगले ते घ्यावे, अशी शिकवण आपल्या संस्कृतीने दिली आहे. दशानन रावणात अनेक दुर्गुण होते,पण काही चांगले गुणही होते. याच गुणांच्या समुच्चयाने त्याची पूजा सांगोळ्यात करण्यात येते. बाळापूर तालुक्यातील वाडेगाव नजीक हे गाव आहे. गावाच्या पूर्वेस एका ओट्यावर रावणाची पुरातन मूर्ती आहे. हे मंदिर या गावाचे वैशिष्ट्य तसेच श्रद्धास्थानही आहे. रावण कपटी, अहंकारी होता. अमर्याद भोगलालसा आणि महत्त्वाकांक्षा या अवगुणांमुळे त्यात असुरी वृत्ती होती. रावणातील हे दुर्गुण बाजूला सारले, तर त्याच्यातील गुणांचे दर्शन होते. तपस्वी, बुद्धिमान, शक्तीशाली, वेदाभ्यासी या गुणांमुळेच सांगोळ्यात रावणाची पूजा केली जाते.

 

हे रावणाचे मंदिर जिल्ह्यातले नव्हे तर राज्यातले एकमेव असल्याचे बोलले जाते. महापंडित रावणाची लंका नगरी अकोला पासून हजारो किलो मीटर दूर आहे, पण अकोला जिल्ह्यातल्या सांगोड़ा या गावात महापंडित दशानन रावणाची नित्यनियमाने पूजा केली जाते. गेल्या 200 वर्षांपूर्वी या भागात वास्तव्यास असणाऱ्या एका ऋषीने गावाच्या पश्चिमेस असलेल्या जंगलात तपश्चर्या केली होती. त्यांच्याच प्रेरणेने गावात अनेक धार्मिक उपक्रमही होतात. ऋषी ब्रह्मलीन झाल्यानंतर एका शिल्पकाराकडे त्यांची मूर्ती बनविण्याचे काम सोपविण्यात आले. पण, त्याच्या हातून घडली ती दशानन रावणाची मूर्ती. दहा तोंडं,काचा बसवलेले 20 डोळे, सर्व आयुध असलेले 20 हात अशी विराट मूर्ती त्याने घडवली. दहा फाटे असलेले सिंदीचे झाड आणि अवचित घडलेली ही लंकेश्वराची मूर्ती… हा योगायोग श्रद्धाळू ग्रामस्थांनी हेरला आणि गावात लंकेश्वर स्थिरावले. गावात रावणाचे मंदिर बांधले जावे, अशी आता ग्रामस्थांची इच्छा आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number