जय भद्राच्या जयघोषाने खुलताबादनगरी दुमदुमली

खुलताबाद येथील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या भद्रा मारूतीच्या दर्शनासाठी आज हनुमान जन्मोत्सवानिमित्त भाविकांची मोठी गर्दी झाली आहे.

जय भद्राच्या जयघोषाने खुलताबादनगरी दुमदुमली

छत्रपती संभाजीनगर : खुलताबाद येथील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या भद्रा मारूतीच्या दर्शनासाठी आज हनुमान जन्मोत्सवानिमित्त भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून दर्शनासाठी रात्री लाखो भाविक पायी चालत आले. पहाटे चार वाजता हनुमान जन्मोत्सव सोहळा उत्साहात पार पडला.

हनुमान जन्मोत्सवानिमित्त भद्रा मारूतीच्या मुर्तीचा शृगांर करण्यात आला आहे. शुक्रवारी रात्रीपासूनच भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. यात प्रामुख्याने छत्रपती संभाजीनगर येथून पायी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी होती. भद्रा हनुमान की जय म्हणत भाविक दर्शन घेत होते, दिवसभर हनुमान भक्तांनी खुलताबादनगरी दुमदुमली गेली आहे. श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त भाविकांसाठी भद्रा मारुती मंदिर 28 तास सुरू ठेवण्यात येणार आले आहे. 

हेही वाचा : हनुमानाचे एकही मंदिर 'या' गावात नाही

जय भद्राच्या जयघोषानी खुलताबादनगरी दुमदुमली आहे. भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी हनुमान जन्मोत्सवानिमित्त भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. दर्शनासाठी शुक्रवारी रात्री दहापासून भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा सुरू झाल्या आहेत. एक किलोमीटरपर्यंतच्या रांगेत उभे राहून दीड तासानंतर दर्शन मिळत आहे. यावर्षी सुमारे 11 लाख भाविक दर्शनासाठी येतील. यादृष्टीने मंदिर संस्थानने व्यवस्था केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number