जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे
विहीर चोरीला गेली असे आपण ऐकलेय. आता ठाण्यात 12 शौचालाय चोरीला गेलेत ते ही एक कोटी 19 लाखांचे.
ठाणे महानगर पालिका परिसरातील दिवामध्ये हा घोटाळा झालाय. मे. एल.के. देवळे या कंपनीला शौचालय बांधणीचं कंत्राट देण्यात आलं होत.
कंत्राटदरानं काम सुरू केले. शौचालय बांधून झालं म्हणून महापालिकेने कंत्राटदाराला बिलाची रक्कम सुद्धा दिली. पण वास्तविक याठिकाणी एकही शौचालय बांधण्यात आलं नाही.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.