Delhi Car Blast: कट उघड झाल्याने केला आत्मघातकी हल्ला; फरिदाबाद मॉड्यूलबाबत मोठा खुलासा

सूत्रांच्या माहितीनुसार, हा स्फोट एका ‘फिदायीन’ हल्लेखोराने घडवून आणला असून, फरिदाबाद मॉड्यूल उघड झाल्यानंतर या हल्ल्याची योजना आखण्यात आली होती.<br/>
Delhi Car Blast: कट उघड झाल्याने केला आत्मघातकी हल्ला; फरिदाबाद मॉड्यूलबाबत मोठा खुलासा

Delhi Car Blast: राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार बॉम्बस्फोटाने देशभरात खळबळ उडाली आहे. प्राथमिक तपासात हा हल्ला आत्मघातकी असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, हा स्फोट एका ‘फिदायीन’ हल्लेखोराने घडवून आणला असून, फरिदाबाद मॉड्यूल उघड झाल्यानंतर या हल्ल्याची योजना आखण्यात आली होती. स्फोटानंतर सर्व तपास यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या असून, एनएसजी (NSG) आणि आयएनए (INA) च्या पथकांकडून संशयित ठिकाणी छापेमारी सुरू आहे. उत्तर प्रदेशातील काही भागांतून अनेक संशयितांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे. तसेच फरिदाबाद परिसरातही सुरक्षा यंत्रणांनी कडक पहारा ठेवला आहे.

हेही वाचा – Major Blasts in India: भारताच्या सुरक्षेला हादरा देणाऱ्या स्फोटांची मालिका; कालानुक्रमाने जाणून घेवूयात

दरम्यान, ‘जैश-ए-तैयबा’ या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याचा दावा करणारी एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली असून, ती सुरक्षा यंत्रणांकडून तपासली जात आहे. दरम्यान, 10 नोव्हेंबर रोजी एनसीआरमधील फरिदाबाद आणि सहारनपूरमध्ये मोठा मोठा कट उधळून लावण्यात आला होता. जम्मू-काश्मीर पोलीस आणि हरियाणा पोलिसांच्या संयुक्त कारवाईत सात जणांना अटक करण्यात आली होती, ज्यात एक वैद्यकीय व्यावसायिक आणि एक मौलवी यांचा समावेश होता. या कारवाईत 360 किलोग्रॅम स्फोटके, दारूगोळा आणि दोन रायफल्स जप्त करण्यात आल्या होत्या.

हेही वाचा – Delhi Red Fort Blast: लाल किल्ल्याजवळील भीषण स्फोटानंतर दिल्लीसह देशातील या शहरांमध्ये सुरक्षा वाढवली

या पार्श्वभूमीवर दिल्लीतील स्फोटाला गंभीर सुरक्षात्मक दृष्टीने पाहिले जात असून, केंद्र आणि राज्यातील सर्व सुरक्षा एजन्सी सतर्क झाल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध करत म्हटले आहे की, “संपूर्ण देश पीडितांसोबत उभा असून कट रचणाऱ्यांना सोडले जाणार नाही.”

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version