वृत्तसंस्था, नवी दिल्ली
जम्मू काश्मीरच्या सुंजवा परिसरतल्या लष्करी कँपवर दहशतवाद्यांनी गोळीबार केलाय. या परिसरात 3 ते 4 दहशतवादी घुसल्याची माहिती समोर आली आहे.
परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेता लष्कराकडून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. या ह्ल्ल्यात एका दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय लष्कराला यश आले आहे.
तर 3 जवान जखमी झालेत. एकूणच सीमेवर पाकच्या कुरापती सुरुच असल्याचं दिसून येतंय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.