मुंबई: मुंबई हाय जवळील नौका दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत ३७ जणांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी रात्री आणखी ११ कर्मचाऱ्यांचे मृतदेह नौदलाला सापडले आहेत. या दुर्घटनेत नौदलाला १८६ कर्मचाऱ्यांना वाचवण्यात यश आलं आहे.
ओएनजीसीच्या हीरा इंधन विहीर परिसरात एसएआर बार्ज पी ३०५ नौका तौक्ते चक्रीवादळात सोमवारी रात्री समुद्रात बुडाली. अपघाताच्या वेळी २६१ कर्मचारी तेथे कार्यरत होते. या सर्व कर्मचाऱ्यांचा शोध घेण्यासाठी नौदलाच्या पाच युद्धनौका, तटरक्षक दलाच्या दोन नौका तसेच दोन अन्य जहाजे बचावकार्य करीत आहेत.