Sweets Price Hike : महागाईमुळे गणेश भक्तांचे बजेट कोलमडणार, पाहा मोदक-पेढे किती रुपयांनी महागले?

जळगाव: सर्व गणेशभक्त बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी करत आहेत, अशावेळी मिठाईचे दर कडाडल्यामुळे ग्राहकांची चिंता वाढली आहे. घरगुती गणपती असो वा मंडळातला बाप्पा, गणेशोत्सवात प्रसाद, नैवेद्य यांचा पुरवठा

Sweets Price Hike : महागाईमुळे गणेश भक्तांचे बजेट कोलमडणार, पाहा मोदक-पेढे किती रुपयांनी महागले?

 

जळगाव: सर्व गणेशभक्त बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी करत आहेत, अशावेळी मिठाईचे दर कडाडल्यामुळे ग्राहकांची चिंता वाढली आहे. घरगुती गणपती असो वा मंडळातला बाप्पा, गणेशोत्सवात प्रसाद, नैवेद्य यांचा पुरवठा मोठ्या प्रमाणावर करावा लागतो. मात्र अशातच साखर, खवा अन् दुधाच्य किंमतीत दरवाढ झाल्याने मोदक-पेढेसुद्धा  महागले आहेत. 

बाजारपेठेतील नेमकी दरवाढ किती ?
मोदक, पेढा, मावा आणि मिठाईच्या दरात किलोमागे तब्बल 120 रुपयांची वाढ
ड्रायफ्रूट्स व मलाई मोदक 200 ते 300 रुपयांनी महाग

हेही वाचा – Lalbaugcha Raja 2026 : बहुप्रतीक्षित लालबागचा राजा 2026 चा प्रथम दर्शन सोहळा संपन्न; बाप्पाचं भव्य रूप पाहण्यासाठी गणेशभक्तांची अलोट गर्दी

गणेशोत्सवात प्रसादासाठी मोठ्या प्रमाणात मोदक, पेढे आणि मिठाई यांची खरेदी केली जाते. परंतु या महागाईने गणेश भक्तांचे बजेट पूर्णपणे बिघडवले आहे; पूर्वी किलोभर मिठाई घेणारे ग्राहक आता पावशेरवर-अर्धा किलो वर समाधान मानत आहेत. परंतु सुकामेव्याचे भाव वाढल्याने त्यापासून तयार होणाऱ्या पदार्थांच्या किंमतीही वाढवाव्या लागत असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
 

यंदा बाजारातील प्रत्येक वस्तूच्या दरात मोठी वाढ झाली असून त्याचा थेट फटका सामान्य ग्राहकांना बसत आहे. “दरवाढ कुठेतरी थांबायला हवी. आधी जिथे आम्ही एक किलो सामान आणायचो, तिथे आता त्याच पैशात फक्त पावशेर मिळतंय,” अशा शब्दांत ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे यंदा गणपती बाप्पाच्या प्रसादासाठीही ग्राहकांना वाढीव दराचा भार सोसावा लागणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number