वृत्तसंस्था, नवी दिल्ली
वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत राहणारे सामाजिक कार्यकर्ते स्वामी अग्निवेश यांना दिल्लीतील दिनदयाल उपाध्याय मार्गावर मारहाण करण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून व्हिडिओत तरुणांचा घोळका अग्निवेश यांना मारहाण करताना दिसत आहे.
स्वामी अग्निवेश हे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शनासाठी जात असताना त्यांना मारहाण करण्यात आली.
स्वामी अग्निवेश यांना गेल्या महिन्यात झारखंडमधील पाकूर भागात त्यांनी गोमांसासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले होते. अग्निवेश यांनी गोमांस खाण्याच्या समर्थनार्थ तसेच नक्षलवादासंदर्भात केलेल्या विधानांमुळे भाजपाच्या संतप्त कार्यकर्त्यांनी हा हल्ला केला होता. त्यावर संतापलेल्या भाजयुमो आणि अभाविपच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर हल्ला केला होता. स्वामी अग्निवेश थांबलेल्या हॉटेलच्या बाहेर मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमले होते. त्याचवेळी त्यांनी स्वामी विरोधी घोषणाबाजीही केली.
झारखंडमधील घटनेनंतर स्वामी अग्निवेश यांना पुन्हा एकदा लक्ष्य करण्यात आले. या व्हिडिओत एक महिला देखील अग्निवेश यांना मारहाण करत असताना दिसत आहे. ‘अग्निवेश परत जा’, अशा घोषणा या तरुणांनी दिल्या.
वाजपेयींना अखेरचा निरोप – Pics
वाजपेयींच्या अंत्यदर्शनाला आलेल्या स्वामी अग्निवेश यांना मारहाण…
वाजपेयींवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, मानसकन्या नमिता यांनी दिला मुखाग्नी
वाजपेयींच्या श्रद्धांजली प्रस्तावाला विरोध, नगरसेवकाला मारहाण
राज ठाकरेंची व्यंगचित्राद्वारे अटलजींना श्रद्धांजली…
जाणून घ्या वाजपेयींच्या संपत्तीबद्दल…
वाजपेयी यांच्या अंत्यविधीला पाकिस्तानचेही प्रतिनिधी उपस्थित…
वाजपेयींचे पार्थिव भाजप मुख्यालयात दाखल…
अशुभ ’13’ अंकाशी वाजपेयींचं खास नातं
वाजपेयींच्या पार्थिवावर आज होणार अंत्यसंस्कार…
वाजपेयींच्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीतील 5 निर्णायक घटना!
भारतरत्न अटलजींसाठी सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर…
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची कारकीर्द…
अटलबिहारी वाजपेयींसाठी देशभरात प्रार्थना, देशातील सर्व नेते एम्समध्ये दाखल…