वृत्तसंस्था, नवी दिल्ली
पाकिस्तानी रुग्णांचे प्रलंबित असलेले सर्व वैद्यकीय व्हिसा मंजूर करण्यात येतील, अशी घोषणा करीत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानी रुग्णांना दिवाळीची भेट दिली.
‘दिवाळीनिमित्त प्रलंबित असलेले पाकिस्तानी रुग्णांचे सर्व वैद्यकीय व्हिसा मंजूर करण्यात येतील. अर्जदारांनी पाकिस्तानातील भारतीय उच्चायुक्तांशी संपर्क साधावा. ते व्हिसा मंजूर करतील, ’ असं ट्विट सुषमा स्वराज यांनी केलंय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.