बॉलिवूड सेन्सेशन सनी लिओनी फेसबुकवर मोस्ट एंगेजिंग सेलिब्रिटी ठरली आहे. ‘स्कोर ट्रेंड्स इंडिया’च्या चार्ट’नुसार, फेसबुकवर सनीला सर्वाधिक सर्च केलं जातं.
इतर बॉलिवूड सेलिब्रिटींना मागे टाकत सनी 100 गुणांसह सर्वाधिक चर्चित फेसबुक सेलिब्रिटी बनली आहे. ‘सुई धागा’ फेम अनुष्का शर्मा 90 गुणांसह या यादीत दुस-या स्थानावर आहे. तर माधुरी दीक्षित 86 गुणांसह तिस-या, प्रियांका चोप्रा 84 गुणांसह चौथ्या आणि जॅकलिन फर्नांडिस 83 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.
अमेरिकेच्या ‘स्कोर ट्रेंड्स इंडिया’ या मिडिया-टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही लिस्ट दिली आहे. स्कोर ट्रेंड्स इंडियाचे सह-संस्थापक अश्वनी कौल म्हणाले की, “गेल्या काही दिवसांमध्ये ‘करनजीत कौर’ या वेबसीरिजीमुळे सनीची लोकप्रियता खूप वाढली. त्यातच तिचा रणविजयसोबत स्प्लिस्टविला सिझन 11 हा शो देखील सुरू झाला. त्यामुळे सनीची डिजिटल माध्यमांमध्ये लोकप्रियता खूप वाढली. ती फेसबुकवर सर्वाधिक सर्च होऊ लागली. फेसबुकवर तिच्याविषयी पोस्ट आणि रिपोस्ट झाल्या.”
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.