हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक

हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक

रेल्वे मार्गांवरील रुळांची दुरुस्ती आणि तांत्रिक कामांसाठी रविवारी 9 एप्रिल रोजी हार्बर रेल्वे आणि पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हार्बर रेल्वेवर सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. तर, पश्चिम रेल्वे मार्गावर सकाळी 10.00 ते दुपारी 3.00 वाजेपर्यंतर मेगाब्लॉक असणार आहे.

हार्बर रेल्वे

  • कुर्ला-वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे.

हार्बर रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक असल्यामुळे सीएसएमटी येथून पनवेल/बेलापूरपकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. तर, पनवेल येथून सीएसएमटीकरीता सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. या मेगाब्लॉक दरम्यान, सीएसएमटी ते कुर्ला स्थानकादरम्यान लोकल धावणार आहेत. तसेच, ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकादरम्यान ट्रान्सहार्बर मार्ग उपलब्ध असेल.


श्चिम रेल्वे

  • सांताक्रूझ ते गोरेगाव अप-डाउन जलद मार्गावर सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे.

अप-डाउन जलद मार्गावरील लोकल सेवा सांताक्रूझ ते गोरेगाव स्थानकादरम्यान धीम्या मार्गावर वळविल्या जातील. तसेच, बोरिवलीहून सुटणाऱ्या काही लोकल रेल्वेगाड्या गोरेगाव स्थानकापर्यंत धावतील.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version