‘सुभाष देसाई आमच्या सोबतच’

‘सुभाष देसाई आमच्या सोबतच’

उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय सुषाभ देसाईंचा मुलगा भूषण देसाई यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भूषण देसाईंनी पक्षप्रवेश केला आहे. त्यामुळे उद्धव गटाला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, भूषण देसाई यांनी शिंदे गटात प्रवेश केला असला तरी सुभाष देसाई आमच्या सोबतच असल्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले, सुभाष देसाई आमच्यासोबत असून भूषण देसाई यांचा शिवसेनेशी काहीही संबंध नाही. पण, त्यांना वॉशिंगमशीनमध्ये उडी मारायची असेल तर जाऊ शकतात, असे ते म्हणाले. सुभाष देसाई हे दररोज उद्धव ठाकरे यांच्यासोबत काम करत असतात. त्यांना पद, मंत्रीपद नसलं तरीही ते 24 तास पक्षासाठी झटत असतात. त्यांचा आदर्श घेऊन आम्ही काम करत आहोत, असेही ते म्हणाले.

बाळासाहेब हे माझे दैवत – भूषण देसाई

पक्षप्रवेशादरम्यान, बाळासाहेब हेच माझे दैवत असल्याचे भूषण देसाई म्हटले. ते म्हणाले, राज्याचा विकास आणि बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत आहेत. मी मुख्यमंत्री शिंदेंचे काम पाहिले आहे. शिंदे यांच्या कामाची पद्धतही माहित आहे. त्यामुळे त्यांच्यासबोत काम करण्याचा निर्णय घेतला असून शिवसेनेत प्रवेश केला असल्याचे भूषण देसाई म्हणाले. तसेच, पक्षप्रवेश करणार असल्याचे माझे वडील आणि उद्धव गटाचे नेते सुभाष देसाई यांना कल्पना दिली असल्याचेही ते म्हणाले.

सुभाष देसाई आणि मातोश्री यांचे काय आहे नाते?

  • सुभाष देसाई बाळासाहेबांचे निष्ठावंत
  • बाळासाहेबांच्यासोबत शिवसेना उभारणीत सहभाग
  • सुभाष देसाईंची ओळख गप्प बसून काटा काढणारा राजकारणी
  • उद्धव यांचा विश्वास संपादन करण्यात सुभाष देसाई यशस्वी
  • भुजबळ, राणे, राज सोडून गेल्यावर देसाईंनी पक्ष सांभाळला
  • सुभाष देसाईंना तीन मुले
  • भूषण हा सुभाष देसाई यांचा दुसरा मुलगा
  • सुभाष देसाई उद्योग मंत्री असताना भूषण सक्रिय
  • देसाई मंत्री असताना भूषणच्या आर्थिक व्यवहारांची चर्चा
  • भूषण शिंदेंसोबत तर सुभाष देसाई ‘मातोश्री’ सोबत

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version