१७ ऑगस्ट, २०२४, छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये २५३ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पैठणच्या केकत जळगाव येथील जिल्हा परिषद शाळेमधील विद्यार्थ्यांना बिस्किटातून विषबाधा झाल्याचा प्रकार घडला आहे. दरम्यान सर्व मुलांना पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेनंतर पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.