MHT-CET Admission Rules : सरकारचा मोठा निर्णय! CET सोबत बारावीच्या गुणांनाही महत्त्व; उच्च व तंत्रशिक्षण विभागाची 5 सदस्यीय समिती स्थापन

मुंबई : बारावीत कमी गुण मिळूनही सीईटीत उत्तम मार्क मिळालेल्या विद्यार्थ्यांवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. सीईटी परीक्षेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिह्न उपस्थित झाल्यानंतर आता अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी केवळ सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) नव्हे, तर बारावीच्या परीक्षेतील गुणांनाही महत्त्व देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासाठी राज्य सरकारकडून पाच सदस्यीय समितीची स्थानपना करण्यात आली आहे. या दोन्ही अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी […]

MHT-CET Admission Rules : सरकारचा मोठा निर्णय! CET सोबत बारावीच्या गुणांनाही महत्त्व; उच्च व तंत्रशिक्षण विभागाची 5 सदस्यीय समिती स्थापन

मुंबई : बारावीत कमी गुण मिळूनही सीईटीत उत्तम मार्क मिळालेल्या विद्यार्थ्यांवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. सीईटी परीक्षेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिह्न उपस्थित झाल्यानंतर आता अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी केवळ सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) नव्हे, तर बारावीच्या परीक्षेतील गुणांनाही महत्त्व देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासाठी राज्य सरकारकडून पाच सदस्यीय समितीची स्थानपना करण्यात आली आहे. या दोन्ही अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एमएचटी-सीईटीतील पर्सेंटाइल आणि बारावीच्या गुणांची टक्केवारी यांचा विचार करून गुणवत्ता यादी निश्चित करण्याचे धोरण ठरवण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने तज्ज्ञ समिती नेमली असून या समितीला 15 दिवसांत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

हेही वाचा : Sharad Pawar NCP : शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीत महिला आघाडी नेतृत्वात बदल; विदर्भातील 'या' महिला नेत्याला मिळू शकते संधी, लवकरच होणार घोषणा

अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी गुणवत्ता यादी निश्चित करण्याच्या पद्धतीत आवश्यक बदल करून त्याची अंमलबजावणी करण्याबाबत सीईटी कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी 2 सप्टेंबर रोजी शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार प्रवेशाचे नवे धोरण ठरवण्यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय 17 सप्टेंबरच्या शासन निर्णयाद्वारे घेण्यात आला आहे. बारावीचे गुण आणि सीईटीतील पर्सेंटाइल यांचे प्रमाण निश्चित करण्याची जबाबदारीही समितीवर सोपवण्यात आली आहे. या दोन्ही परीक्षांच्या निकालांमध्ये समतोल साधता येईल आणि गुणवत्ता यादी अधिक पारदर्शक, वस्तुनिष्ठ व सर्व उमेदवारांसाठी समतोल राहील, यासाठी प्रवेश प्रक्रियेतील गुणांकन पद्धतीचा अभ्यास केला जाणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number