Dhule ST Bus And Truck Accident : विद्यार्थ्यांच्या किंचाळ्यांनी परिसर हादरला! एसटी बस अन् ट्रकची जोरदार धडक; 45 विद्यार्थी जखमी तर 6 जणांची प्रकृती गंभीर

धुळे देऊर ते म्हसदी दरम्यान आगाराच्या मानव विकास योजनेच्या बस आणि समोरून येणाऱ्या मालवाहू ट्रकच्या जोरदार धडकेत सुमारे 30 विद्यार्थी आणि बस वाहक जखमी झाले आहेत.

Dhule ST Bus And Truck Accident : विद्यार्थ्यांच्या किंचाळ्यांनी परिसर हादरला! एसटी बस अन् ट्रकची जोरदार धडक; 45 विद्यार्थी जखमी तर 6 जणांची प्रकृती गंभीर

धुळे आगाराच्या मानव विकास योजनेच्या बसला देऊर ते म्हसदी दरम्यान समोरून येणाऱ्या मालवाहू ट्रकने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात बसमधील सुमारे 30 विद्यार्थी आणि बस वाहक जखमी झाले आहेत.
​पिंपरखेडहून म्हसदीकडे शालेय फेरी घेऊन जाणाऱ्या या बसमध्ये सुमारे 45 विद्यार्थी व प्रवासी प्रवास करत होते.

हेही वाचा- Nashik News : दोन दिवसांपासून ताप, उपचार करून पुन्हा आश्रमशाळेत आणलं अन्…; नाशिकमध्ये 8 वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी अंत

देऊर ते म्हसदी दरम्यानच्या वळणावर रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष झाल्याने बस आणि टाटा ट्रकची समोरासमोर धडक झाली. यात बसच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले असून वाहक मनिषा साळुंखे यांच्या पायाला दुखापत झाली आहे. ​घटनेची माहिती मिळताच नेर दूरक्षेत्र पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी विद्यार्थ्यांना साक्री ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

सर्व जखमी विद्यार्थी म्हसदी येथील स्वर्गीय अण्णासाहेब आर. डी. देवरे कला व विज्ञान महाविद्यालय आणि सी. डी. देवरे ज्युनिअर कॉलेजचे आहेत. अपघाताचे वृत्त समजताच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉ. तुळशीराम गावित यांनी रुग्णालयात जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेतली, तर साक्रीचे आगार व्यवस्थापक राजेंद्र अहिरे आणि धुळे विभाग नियंत्रक पुरुषोत्तम व्यवहारे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number