Jalna: जालन्यात धक्कादायक घटना! ड्युटीवर असतानाच SRPF जवानाने उचललं टोकाचं पाऊल

जालना जिल्ह्यातील SRPF छावणीत पहाटे घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

Jalna: जालन्यात धक्कादायक घटना! ड्युटीवर असतानाच SRPF जवानाने उचललं टोकाचं पाऊल

जालना: जालना जिल्ह्यातील SRPF छावणीत पहाटे घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे खळबळ उडाली आहे. कर्तव्यावर असलेल्या 25 वर्षीय SRPF जवानाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली असून, त्याच्यावर सध्या छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला असून, या प्रकारामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, जालना येथील SRPF कॅम्पमध्ये पहाटे सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. ड्युटीवर असताना जवानाने स्वतःला इजा पोहोचवली. त्यानंतर सहकाऱ्यांच्या लक्षात ही बाब येताच तातडीने त्याला उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले.

हेही वाचा: Crime News : पार्टीत चिकनचे पीस जास्त खाण्यावरून वाद… आरोपीने मित्राला चाकू भोसकून संपवलं

जखमी जवानाचे नाव अजय माधवराव वाकोडे असे असून, ते SRPF मध्ये कार्यरत आहेत. त्यांना गंभीर दुखापत झाल्याने प्रथम स्थानिक स्तरावर वैद्यकीय मदत देण्यात आली. त्यानंतर अधिक उपचारासाठी त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तसेच या प्रकरणाशी संबंधित साहित्य जप्त करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे. सध्या या घटनेमागील कारणांचा सर्व बाजूंनी तपास करण्यात येत असून, सहकारी जवान आणि संबंधित व्यक्तींची चौकशी केली जात आहे.

हेही वाचा: Phaltan Doctor News : फलटणमधील आणखी एका डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल! सायन स्टेशनवरच घडला धक्कादायक प्रकार 29 ऑगस्टला इन्स्टाग्राम व्हिडिओद्वारे..

दरम्यान, या घटनेमुळे SRPF कॅम्पमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. जवानाच्या प्रकृतीबाबत कुटुंबीय आणि सहकाऱ्यांकडून सतत माहिती घेतली जात असून, त्याच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना व्यक्त केली जात आहे.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number