Summer Special Train 2026 : रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! उन्हाळ्याच्या सुट्टीत उत्तर आणि दक्षिण भारत ‘स्पेशल’ गाड्यांनी जोडला जाणार

या निर्णयामुळे महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, तेलंगणा आणि तामिळनाडू या राज्यांमधील प्रवाशांना थेट रेल्वे संपर्क उपलब्ध होणार असून उन्हाळी प्रवासाचा मार्ग सुखकर होणार आहे.
Summer Special Train 2026 : रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! उन्हाळ्याच्या सुट्टीत उत्तर आणि दक्षिण भारत ‘स्पेशल’ गाड्यांनी जोडला जाणार

Summer Special Train 2026 : उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये होणारी प्रवाशांची प्रचंड गर्दी आणि आरक्षणाची समस्या लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे. दक्षिण रेल्वेने दक्षिण मध्य रेल्वेच्या समन्वयाने उत्तर आणि दक्षिण भारताला जोडणारी 'कोयंबतूर–जयपूर–कोयंबतूर' विशेष साप्ताहिक एक्सप्रेस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, तेलंगणा आणि तामिळनाडू या राज्यांमधील प्रवाशांना थेट रेल्वे संपर्क उपलब्ध होणार असून उन्हाळी प्रवासाचा मार्ग सुखकर होणार आहे.

कोयंबतूर–जयपूर स्पेशल ट्रेनचे वेळापत्रक
या विशेष गाडीच्या एकूण 9 फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. या ट्रेनमध्ये एकूण 20 एलएचबी डबे असतील, ज्यात 18 वातानुकूलित (AC) थ्री-टियर डबे आणि 2 लगेज-कम-ब्रेक व्हॅनचा समावेश असेल.
– गाडी क्रमांक 06181 (कोयंबतूर ते जयपूर): ही गाडी दर गुरुवारी कोयंबतूर येथून पहाटे 02.30 वाजता सुटेल आणि शनिवारी दुपारी 13.25 वाजता जयपूरला पोहोचेल.
– गाडी क्रमांक 06182 (जयपूर ते कोयंबतूर): ही परतीची गाडी 12 एप्रिल ते 07 जून या कालावधीत दर रविवारी रात्री 22.05 वाजता जयपूरवरून सुटेल आणि बुधवारी सकाळी 08.30 वाजता कोयंबतूरला पोहोचेल.

राजस्थान, गुजरात, तेलंगणा आणि तामिळनाडू राज्यांशी थेट रेल्वेने संपर्क
ही गाडी तिरुप्पूर, इरोड, सालेम, कटपडी, रेणीगुंटा, काचीगुडा, निजामाबाद, बासर, मुदखेड, नांदेड, पूर्णा, हिंगोली, वाशीम, अकोला. भुसावळ, जळगाव, नंदुरबार, उधना, वडोदरा, गोधरा, रतलाम, नीमच, चीतौरगढ , अजमेर मार्गे धावेल.

हेही वाचा – Mathura Boat Accident : वृंदावनमध्ये भाविकांवर काळाचा घाला, यमुना नदीत बोट उलटलून 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू, अनेक जण बेपत्ता

नांदेड विभागातील महत्त्वाचे थांबे
ही गाडी विविध राज्यांतील महत्त्वाच्या शहरांमधून जाणार असून नांदेड विभागातील प्रवाशांसाठी खालील स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. नांदेड विभागात ही गाडी मुदखेड, नांदेड, पूर्णा, हिंगोली, वाशीम आणि अकोला या स्थानकांवर थांबणार असून, या भागातील प्रवाशांना राजस्थान, गुजरात, तेलंगणा आणि तामिळनाडू राज्यांशी थेट रेल्वे संपर्क उपलब्ध होणार आहे.

अकोला-तिरुपती विशेष गाडीला मुदतवाढ
प्रवाशांची वाढती मागणी पाहता, दक्षिण मध्य रेल्वेने अकोला-तिरुपती विशेष गाडीच्या फेऱ्यांमध्ये वाढ केली आहे.
गाडी क्रमांक 07606 (अकोला-तिरुपती): ही विशेष गाडी रविवारी धावणार असून तिची सेवा आता 12 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे. ही गाडी आपल्या विद्यमान वेळापत्रक आणि थांब्यांसह धावेल, ज्यामुळे तिरुपती दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांना मोठा फायदा होणार आहे.

हेही वाचा – Child Passport Rules: मुलांच्या पासपोर्टबाबत न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; आता वडिलांच्या नावाशिवायही मिळणार पासपोर्ट

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version