मराठा क्रांती मोर्चाचे ठिय्या आंदोलन, मुख्यमंत्र्यांचा केला निषेध…

मराठा क्रांती मोर्चाचे ठिय्या आंदोलन, मुख्यमंत्र्यांचा केला निषेध…

जय महाराष्ट्र न्यूज, सोलापूर

आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे. मराठा समाजाने रस्त्यावर उतरून चक्काजाम आंदोलन केले आहे.

मराठा समाजाचा आरक्षणासाठीचा 2 वर्षांपासून लढा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चा सोलापूर शाखेने शिवाजी चौकात शनिवारी चक्काजाम आंदोलन केले.

आंदोलकांनी 2 एसटी बसची तोडफोड केल्याने या आंदोलनाला ‍हिंसक वळण लागले आहे. चक्काजाम आंदोलनामुळे पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट आणि पुण्याकडे जाणारी वाहतूक पुर्णपणे ठप्प झाली.

आंदोलकांनी मोठ्या संख्येने शिवाजी चौक आणि संभाजी चौकात ठिय्या मांडला. मराठा समाजाला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न केल्याने आंदोलकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निषेध केला आहे.

त्यानंतर शहर पोलिसांनी मराठा समाजातील काही कार्यकर्त्यांना अटक केली आहे. तर दुसरीकडे लातूर-सोलापूर मार्गावर मराठा संघटनेने ठिय्या आंदोलन केल्याने दोन्ही बाजुने वाहनांची कोंडी झाली आहे. 

आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक

  • मराठा क्रांती मोर्चा सोलापूर शाखेचे शिवाजी चौकात चक्काजाम आंदोलन
  • या आंदोलनाला ‍हिंसक वळण
  • ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलनामुळे वाहतूक पुर्णपणे ठप्प
  • आंदोलकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निषेध केला
  • मराठा समाजातील काही कार्यकर्त्यांना अटक
  • लातूर-सोलापूर मार्गावर मराठा संघटनेने ठिय्या आंदोलन केल्याने दोन्ही बाजुने वाहनांची कोंडी

अविश्वास प्रस्तावावर मोदी सरकारने जिंकला विश्वास…

12 वर्षांनी पाकिस्तानच्या सलामीवीरांनी मोडीत काढला विश्वविक्रम…

राहुल गांधींची झप्पी झाली ट्रोल…

लाेकसभेत घडली एेतिहासिक घटना,आधी हल्ला मग गळाभेट…

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version