Solapur Crime : सासरच्या जाचाला कंटाळून करमाळ्यातील सूनेनं पुण्यात घेतला गळफास; पतीला अटक, तर इतर 4 जणांवर गुन्हा दाखल

संतोष कुलकर्णी, प्रतिनिधी  पुणे : पुणे शहरातील चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सासरच्या हुंडा आणि शारीरिक-मानसिक त्रासाला कंटाळून करमाळा तालुक्यातील वरकुटे हे माहेर असलेल्या शुभांगी गरड या 40 वर्षीय विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. याप्रकरणी पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 13 सप्टेंबर 2026 रोजी शुभांगी हिने […]

Solapur Crime : सासरच्या जाचाला कंटाळून करमाळ्यातील सूनेनं पुण्यात घेतला गळफास; पतीला अटक, तर इतर 4 जणांवर गुन्हा दाखल

संतोष कुलकर्णी, प्रतिनिधी 

पुणे : पुणे शहरातील चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सासरच्या हुंडा आणि शारीरिक-मानसिक त्रासाला कंटाळून करमाळा तालुक्यातील वरकुटे हे माहेर असलेल्या शुभांगी गरड या 40 वर्षीय विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. याप्रकरणी पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 13 सप्टेंबर 2026 रोजी शुभांगी हिने आत्महत्या केली होती. याप्रकरणी अभिजीत दिलीप गरड (पती), दिलीप गरड (सासरे),अनिता दिलीप गरड (सासू), अक्षय दिलीप गरड (दीर), प्रियंका अक्षय गरड (जाऊ) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी पती अभिजीत गरड याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, चर्चित ‘हगवणे प्रकरणाप्रमाणे’ या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून उर्वरित सर्व आरोपींना तातडीने अटक करण्यात यावी, अशी आक्रमक मागणी मृत शुभांगीच्या माहेरच्या कुटुंबीयांनी केली आहे. चंदननगर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. 

हेही वाचा : Panvel Crime : दीर म्हणून जवळीक वाढवली, पतीसोबत मिळून रचला भयंकर कट; महिलेसोबत जे केलं ते धक्कादायक…; नवी मुंबईत

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number