रशिया युक्रेन युद्धाचा सोळावा दिवस

रशिया-युक्रेन युद्धाचा आज १६वा दिवस आहे. सोळाव्या दिवशीही रशियाची युक्रेनवर तीव्र लढाई सुरूच आहे. रशियाने आज एसयू-५७ या लढाऊ विमानाने युक्रेनवर हल्ला केला आहे. तसेच रशियाने केलेल्या हल्ल्यामध्ये आतापर्यंत युकेनचे २ हजार ८७० लष्करी सैनिक ठार झाले असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. ‘रशियाविरुद्ध युद्ध लढण्याचा अमेरिकेचा कोणताही हेतू नाही’ व्हाईट हाऊसचे प्रेस सेक्रेटरी जेन साकी […]

रशिया युक्रेन युद्धाचा सोळावा दिवस

रशिया-युक्रेन युद्धाचा आज १६वा दिवस आहे. सोळाव्या दिवशीही रशियाची युक्रेनवर तीव्र लढाई सुरूच आहे. रशियाने आज एसयू-५७ या लढाऊ विमानाने युक्रेनवर हल्ला केला आहे. तसेच रशियाने केलेल्या हल्ल्यामध्ये आतापर्यंत युकेनचे २ हजार ८७० लष्करी सैनिक ठार झाले असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

‘रशियाविरुद्ध युद्ध लढण्याचा अमेरिकेचा कोणताही हेतू नाही’

व्हाईट हाऊसचे प्रेस सेक्रेटरी जेन साकी यांनी सांगितले की, ‘रशियाविरुद्ध युद्ध लढण्यासाठी युक्रेनमध्ये आपले सैन्य पाठवण्याचा अमेरिकेचा कोणताही हेतू नाही. आमचे लक्ष विश्व युद्ध कसे रोखायचे यावर आहे.’ अमेरिका युक्रेनमध्ये सैन्य पाठवणार नसली तरी, युक्रेनला आर्थिक मदत करत आहे.

रशियाचा युक्रेनमधील प्रसूतीगृहावर हल्ला

रशियाची युक्रेनवर लढाई सुरू असून तणावग्रस्त परिस्थिती उद्भवली आहे. दरम्यान, रशियाने युक्रेनमधील प्रसूतीगृहावर हल्ला केला असल्याचा दावा युक्रेनचे राष्ट्रप्रमुख जेलेन्स्की यांनी केला आहे. दरम्यान, अमेरिकेकडून युक्रेनला अब्जावधी डॉलर्सची मदत करण्यात आली. नागरी वस्ती असणाऱ्या ठिकाणांवर हल्ला करणार नाही, असे वचन देणाऱ्या रशियाने नवजात बालकांनाही सोडले नाही. युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रशियाच्या हल्ल्यात दक्षिण पूर्व भागातील मारियुपोल शहरातील एका मॅटर्निटी रुग्णालयावर रशियाकडून हल्ला करण्यात आला. यावेळी रुग्णालयात नवजात बालके आणि त्यांच्या मातांवर उपचार सुरू होते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number