नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील आश्रमशाळेतून रात्री उशिरा बेपत्ता झालेली सहा मुले दारणा नदी परिसरात सुखरूप सापडली आहेत. मुलांचा शोध लागल्याने त्यांचे पालक, शाळा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने सुटकेचा श्वास सोडला आहे. नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील वैतरणा नगर शासकीय आश्रमशाळेतील सहा मुले घराकडे निघाली होती. हे सहा विद्यार्थी वैतरणा नगर येथील शासकीय आश्रम शाळेत पाचवी ते सातवीत शिक्षण घेत असून ते गुरुवारी ही मुले दुपारी 4 वाजता देवगाव येथील घरी जाण्यासाठी शाळेतून निघाली होती.
संदीप वारे (इयत्ता पाचवी), राजू बांगारे (इयत्ता सातवी), रवी बांगारे (इयत्ता सातवी), भास्कर बांगारे (इयत्ता सहावी), रसमा गोरे (इयत्ता सातवी), तेजस वारे (इयत्ता सातवी) अशी बेपत्ता विद्यार्थ्यांची नावे आहेत. तरी देखील रात्रीपर्यंत मुले घरी न पोहोचल्याने पालकांसह ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यानंतर पालकांनी तातडीने आश्रमशाळेत धाव घेतली. यानंतर शाळा आणि घराच्या मार्गावर सध्या शिक्षक आणि पालकांकडून विद्यार्थ्यांचा कसून शोध घेतला जात आहे.
या घटनेमुळे शासकीय आश्रम शाळांमधील मुलांच्या सुरक्षेचा अनास्था कारभार पुन्हा एकदा उघडा पडला असून मुले सुखरूप व लवकरात लवकर सापडावीत अशी मागणी पालकांकडून केली जात होती. या घटनेदरम्यान एक महत्त्वाची माहिती समोर आली. रात्री उशिरापर्यंत शोध घेतल्यानंतर दारणा नदी परिसरात सहाही मुले सापडली. कुणालाही न सांगता मुले आश्रमशाळेतून बाहेर पडल्याने शासकीय आश्रमशाळेतील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
ह्या शासकीय आश्रम शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा नेहमीच धोरणात्मक चर्चेत राहिला आहे. यापूर्वीत्ती एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीने आश्रम शाळांच्या कमकुवत सुरक्षा व्यवस्थेबाबत अनेकदा आवाज उठवण्यात आला होता. मात्र आदिवासी विकास विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी या गंभीर विषयाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला होता. दरम्यान पालक मुलांना घेण्यासाठी शाळेत गेले नसताना मुले बाहेर पडलीच कशी? असा सवाल सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. सुदैवाने सहाही मुले सुखरूप सापडली असून या घटनेने आश्रमशाळेतील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.