मुंबई : सिंधुदुर्ग एक्स्प्रेसचे जनरल डबे पोलिसांसाठी आरक्षित करण्यात आल्याने प्रवाशांमध्ये एकाच गोंधळ उडाला. १५ डब्यांच्या ट्रेनमधील ९ डबे जनरल प्रवाशांसाठी असतात. परंतु, प्रवाशांना कोणतीही पूर्वकल्पना न देता असे बदल करण्यात आल्यामुळे सणासुदीला कोकणातून परतणाऱ्या प्रवाशांना गाडीत बसायला जागा मिळाली नाही. परिणामी गाडीमध्ये गर्दी होऊन प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. काही प्रवाशांच्या मते या डब्यांमधून पोलिस उतरताना दिसल्याने हे डबे पोलिसांसाठी राखीव ठेवण्यात आल्याचे त्यांचे
म्हणणे आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.