जळगावच्या बाजारात सोने-चांदीच्या दरात पुन्हा मोठी भाव वाढ झाली असून आठ दिवसात सोन्याचे भाव हे बारा हजार रुपयांनी तर चांदीचे भाव जवळपास सहा हजार रुपयांनी वाढलेले आहेत. या भाववाढी मागची प्रमुख कारणे अशी आहेत की, जगात वाढलेली आर्थिक आणि भू राजकीय अस्थिरता. युद्धजन्य परिस्थिती भारताच्या तुलनेत बघता डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण. मध्यवर्ती बँक सोने खरेदी करत आहे. फेडरल रिझर्व बँक व्याजदर निश्चित करणार होते मात्र विलंब होत आहे.
अमेरिका महागाई बाबत धोरण निश्चित करणार होती मात्र ते धोरण निश्चित झाले नसून यामुळेच ही भाव वाढ झाली असल्याचे समोर आले आहे. आगामी काळात देखील मोठी भाव वाढ होऊ शकते असा अंदाज सोन्याचा तज्ज्ञांनी व्यक्त केला असून जळगावच्या बाजारात सोन्याचे दर हे जीएसटी सह 1 लाख 65 हजार 315 रुपयांवर जाऊन पोहोचले आहेत. तर चांदीचे दर 2 लाख 55 हजार 440 रुपयांवर जाऊन पोहोचले आहे आगामी काळात देखील सोने चांदीच्या दरात मोठी वाढ होऊ शकते असा अंदाज सोने तज्ञ यांनी व्यक्त केला आहे.